मुंबई : शाहरुख खाननं मुलगा आर्यन खानच्या डेब्यू सीरिजची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. त्यानं आणि त्याची पत्नी गौरी खानच्या प्रोडक्शन हाऊस रेड चिलीजनं आर्यन खानच्या डेब्यू सीरिजसाठी नेटफ्लिक्सशी हातमिळवणी केली आहे. गौरी खान मुलगा आर्यन खानच्या डेब्यू वेब सीरीजची निर्मिती करत आहे. आतापर्यत आर्यन खानच्या वेब सीरीजचं नाव जाहीर करण्यात आलेले नाही. दरम्यान आर्यन खानच्या डेब्यू वेब सीरीजवर कंगना रणौतची प्रतिक्रिया आली आहे. आर्यन खानची वेब सीरीज ही चित्रपटसृष्टीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.
शाहरुख खानची घोषणा :शाहरुख खाननं त्याच्या एक्स हँडलवर मुलगा आर्यन खानच्या डेब्यू सीरिजबद्दलच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'हा एक खास दिवस आहे, जेव्हा एक नवीन कहाणी प्रेक्षकांसाठी सादर केली जात आहे. आजचा दिवस आणखीनच विशेष कारण रेड चिलीज एंटरटेनमेंट आर्यन खानची नवीन वेब सीरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करत आहे. या सीरीजची जबरदस्त कहाणी असणार आहे, यात चांगले सीन्स, भरपूर मजा आणि भावना असेल. आर्यन पुढे जा आणि लोकांचे मनोरंजन कर आणि लक्षात ठेव, शो बिजनेससारखा, दुसरा कोणताही बिजनेस नाही.' आर्यन खानची वेब सीरीज 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.