महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रणवीर सिंगनं लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी दीपिका पदुकोणसाठी शेअर केली आकर्षक पोस्ट... - DEEPIKA PADUKONE

रणवीर सिंगनं दीपिका पदुकोणला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं दीपिकाचे अनेक न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.

wedding anniversary
लग्नाचा वाढदिवस (रणवीर सिंग-दीपिका पदुकोणच्या लग्नाचा वाढदिवस (ANI))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 14, 2024, 2:58 PM IST

मुंबई :बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण आज त्यांच्या लग्नाचा 6वा वाढदिवस साजरा करत आहेत, यानिमित्तानं रणवीर सिंगनं एक विशेष पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टद्वारे रणवीरनं दीपिकाला शुभेच्छा दिल्या आहेत. दीपवीरनं 14 नोव्हेंबर 2018 रोजी लग्न केलं आणि 2024 मध्ये त्यांच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानंतर यावर्षी या जोडप्यानं त्याचं पहिलं अपत्य म्हणून मुलीचे स्वागत केलं. दीपिकानं 8 सप्टेंबरला एका मुलीला जन्म दिला. दीपवीरच्या मुलीच नाव दुआ ठेवण्यात आलंय. याशिवाय अलीकडेच दीपिकानं आपल्या मुलीची पहिली झलक सोशल मीडियावर दाखवली होती.

रणवीरनं लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिल्या दीपिकाला शुभेच्छा :दरम्यान या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यामातून शुभेच्छा देत आहेत. याशिवाय दीपवीरचे चाहते देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान रणवीरनं त्याच्या इंस्टाग्रामवर दीपिकाचे अनेक न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. यात तिच्या प्रेग्नेंसी फोटोशूटच्या फोटोंचाही समावेश आहे. फोटो शेअर करताना रणवीरनं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'प्रत्येक दिवस हा पत्नीची स्तुती करण्याचा दिवस असतो पण आजचा दिवस अधिक खास आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दीपिका पदुकोण, मी तुझ्यावर प्रेम करतो.'

दीपवीरची प्रेमकहणी :आता रणवीरच्या या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, 'माझे आवडते जोडपे, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, 'लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दीपिका रणवीर, नेहमी आनंदी राहा.' याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून रणवीर आणि दीपिकाचं कौतुक करताना दिसत आहेत. दरम्यान 2012 मध्ये आलेल्या 'गोलियों की रासलीला-रामलीला' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणवीर आणि दीपिका यांच्यात जवळीक वाढली होती. या चित्रपटाच्या माध्यामातून पहिल्यांदा दीपवीरनं एकत्र काम केलं होतं. या दोघांनी एकमेकांना 6 वर्षे डेट केल्यानंतर 2018 मध्ये लग्न केलं. 14 नोव्हेंबर रोजी इटलीतील लेक कोमो येथे कोकणी रितीरिवाजांनुसार या जोडप्यानं सात फेरे घेतले.

वर्कफ्रंट : रणवीर आणि दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर दोघेही रोहित शेट्टीच्या आगामी 'सिंघम अगेन' चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. यात रणवीर सिम्बाची भूमिका पुन्हा साकारणार आहे, तर दीपिका 'कॉप युनिव्हर्स' मधील पहिली महिला पोलीस अधिकारी शक्ती शेट्टीची भूमिकेत दिसणार आहे. 'सिंघम अगेन' हा चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होत आहे.

हेही वाचा :

  1. रणवीर सिंगनं वडील झाल्याचा आनंद रिलायन्स इव्हेंटमध्ये केला व्यक्त, व्हिडिओ व्हायरल - Ranveer Singh
  2. मजबूत शरीरसौष्ठवासह रणवीर सिंगनं सुरू केली 'डॉन 3'ची तयारी, पाहा व्हायरल फोटो - Ranveer Singh Don 3
  3. शाहरुख खाननं दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग नवजात कन्येला दिली भेट, व्हिडिओ व्हायरल - SHAH RUKH Meets DEEPIKAS BABY GIRL

ABOUT THE AUTHOR

...view details