मुंबई - Arjun Kapoor : रक्षाबंधन हा सण प्रत्येक बहिण आणि भावासाठी खूप महत्वाचा आहे. रक्षाबंधनानिमित्त अर्जुन कपूरनं एक विशेष संदेश दिला आहे. दरम्यान कोलकाता येथे ट्रेनी डॉक्टरचा बलात्कार आणि हत्या प्रकरण झाल्यानंतर देशात एक खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बॉलिवूड सेलिब्रिटीही सातत्यानं आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.कोलकाता येथील गंभीर घटनेनंतर देशातील प्रत्येक व्यक्ती न्यायाची मागणी करत आहेत. याप्रकरणी अर्जुन कपूरनेही आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली आहे. त्यानं रक्षाबंधनाच्या निमित्तानं महिलांच्या सुरक्षेबाबत काही विशेष गोष्टी सांगितल्या. अर्जुन कपूरनं आपला एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
रक्षाबंधननिमित्त अर्जुन कपूरचा संदेश :अर्जुननं रक्षाबंधन हा सण महिलांच्या सुरक्षेशी संबंधित असल्याचं म्हटलं. शेअर केलेल्या व्हिडिओ त्यानं म्हटलं, "मी माझ्या बहिणींबरोबर रक्षाबंधन सण साजरा करणार आहे. देशात जे काही घडत आहे अशात सण साजरा करणे हे विचित्र वाटत आहे. आपल्या बहिणींचे रक्षण करणे, आपल्या आयुष्यात असणाऱ्या महिलांचे रक्षण करणे. तसेच ज्या महिलांबरोबर तुम्ही प्रेम करत आहात त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. अनेक पुरुषांमध्ये मूलभूत समज आणि शिक्षणाचा अभाव आपण समाजात पाहू शकतो. जेव्हा आपण रक्षाबंधन सण साजरा करतो, तेव्हा आपण भाऊ असल्याबद्दल, काळजी घेण्याबद्दल बोलत असतो. आपल्या सर्व बहिणी भावाशिवाय फिरू शकेल, असे सुरक्षित वातावरण कसे बनवायचे हे आपल्याला का शिकवले जात नाही? पुरुषांनी शिकले पाहिजे की महिला सुरक्षित कशाप्रकारे राहणार."