मुंबई - Abhishek Kumar reaction :रिॲलिटी शो 'बिग बॉस 17' हा खूप हिट झाला होता. या शोमध्ये अभिषेक कुमार, ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांच्यात खूप भांडणं होताना दिसली. अभिषेकला या शोमध्ये ईशा आणि समर्थनं खूप छळलं होतं. मात्र तरीही अभिषेक फिनालेपर्यत पोहचला. अभिषेक टॉप 2मध्ये आला. या शोनंतर तो रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी'मध्ये स्टंट करताना दिसला होता. आता त्याची फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे. अभिषेकला नवीन प्रोजेक्ट मिळत आहेत. दरम्यान, ईशा आणि समर्थचे ब्रेकअप झाल्यानंतर अभिषेकनं याप्रकरणी एक विधान केलं आहे.
ईशा आणि समर्थचं ब्रेकअप :बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वीच ईशा आणि अभिषेकचं ब्रेकअप झालं होतं आणि त्याचं वेळी ती समर्थ जुरेलला डेट करत होती. बिग बॉसच्या घरात जेव्हा समर्थनं प्रवेश केला होता, यानंतर तो खूप नाराज झाला होता. त्यानं बिग बॉसच्या घरातच अभिषेक आणि ईशाचं ब्रेकअप होणार असल्याची भविष्यवाणी केली होती. दरम्यान एका मुलाखतीत अभिषेकनं ईशा आणि समर्थच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया देत म्हटलं, "मी ती क्लिप पुन्हा पाहिली आणि मला आश्चर्य वाटलं की मी इतके अचूक कसे बोललो. मला जाणवले की माणूस दुःखात खरं बोलत असतो. त्यावेळी मला मनातून खूप दुःख झालं होतं." यानंतर त्यानं पुढं म्हटलं, "दोघेही आनंदी राहोत." अभिषेकनं सांगितलं की, तो सध्या सिंगल आहे.