महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'रेफ्यूजी' फ्लॉपनंतर तीन वर्ष केला संघर्ष, अभिषेक बच्चनच्या वाढदिवसनिमित जाणून घ्या विशेष गोष्टी... - ABHISHEK BACHCHAN BIRTHDAY

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनसाठी हा दिवस विशेष आहे. आज तो आपला 49वा वाढदिवस साजरा करत आहे.

Abhishek Bachchan
अभिषेक बच्चन (Abhishek bachchan Photo - ( ANI-IANS))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 5, 2025, 2:00 PM IST

Updated : Feb 5, 2025, 3:21 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आज 5 फेब्रुवारी रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेक बच्चननं 'रेफ्यूजी' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट 2000 साली बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये करीना कपूर त्याच्याबरोबर मुख्य भूमिकेत दिसली होती. ज्युनियर बच्चनला चित्रपटसृष्टीत प्रवेश करून 25 वर्षे पूर्ण झाले आहेत. अभिनय क्षेत्रात अभिषेकनं आतापर्यंत आपल्या वडीलांची बरोबरी केली नाही. चित्रपटसृष्टीत अभिषेकनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. संपूर्ण बच्चन कुटुंबाचं बॉलिवूडमध्ये खूप मोठ नाव आहे. आज अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्याच्याबद्दल काही विशेष गोष्टी सांगणार आहोत.

'ब्लफमास्टर'साठी गायलं होतं गाणं :अभिषेक बच्चन डिस्लेक्सियाचा बळी ठरला आहे. तो नऊ वर्षांचा असताना त्याला याबद्दल कळलं होतं. बॉलिवूडमधील अभिषेकचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. 'ब्लफमास्टर' स्टारनं वडिलांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या 'मेजर साब' चित्रपटात स्पॉट बॉय म्हणून काम केलं आहे. याठिकाणी त्यानं चित्रपटसृष्टीतील अनेक गोष्टी शिकल्या. अभिषेक बच्चनकडे केवळ अभिनयाची प्रतिभा नाही तर, त्याच्याकडे गायनाची प्रतिभा देखील आहे. 'ब्लफमास्टर' (2005) चित्रपटात त्यानं सुनिधी चौहानबरोबर 'राईट हेअर राईट नाऊ' हे गाणं गायलं होतं. अभिषेकनं गायलेलं हे गाणं अनेकांना आवडलं होतं.

डॉन चित्रपटामधील 'खैके पान बनारस वाला' गाण्याबद्दलची कहाणी: दरम्यान अमिताभ बच्चननं 'डॉन' चित्रपटातील 'खैके पान बनारस वाला' या गाण्याबद्दल एक खुलासा केला होता. याबद्दल त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं 'डॉन' चित्रपटातील 'खैके पान बनारस वाला' या सुपरहिट गाण्याचे हुक स्टेप अभिषेक बच्चनकडून मिळाल्या आहेत. कारण जेव्हा हे गाणं वाजलं होतं, तेव्हा अभिषेकनं यावर डान्स करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अभिषेकच्या स्टेप पाहिल्या आणि त्या कॉपी केल्या.

अभिषेकनं जवळजवळ तीन वर्षे केला संघर्ष :'रिफ्यूजी' चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर अभिषेकनं 'तेरा जादू चल गया', 'ढाई अक्षर प्रेम के', 'ओम जय जगदीश' आणि 'मैं प्रेम की दिवानी हूं' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र त्याला सारखे अपयश येत होते. त्यानं सुमारे तीन वर्षे संघर्ष केला. यानंतर अभिषेकनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं, मात्र त्याला बॉलिवूडमध्ये काही वेगळं करता आलं नाही. यानंतर त्यानं 'धूम', 'बंटी और बबली' आणि 'युवा' या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचे हे चित्रपट खूप गाजले. तसेच त्याला 'सरकार'मध्येही चांगली भूमिका करण्याची संधी मिळाली. 'गुरु' हा अभिषेकच्या कारकिर्दीतील धमाकेदार चित्रपट ठरला. तसेच अभिषेक बच्चनचा शेवटचा चित्रपट 'आय वॉन्ट टू टॉक' होता. आता पुढं तो 'हाऊसफुल 5' चित्रपटात दिसणार आहे. तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, अभिषेक बच्चन हा पत्नी ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्याबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अभिषेक आणि ऐश्वर्या राय बॉलिवूडमधील पावरफुल जोडप्यांपैकी एक आहे.

हेही वाचा :

  1. अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चनच्या घटस्फोटाची बातमी 'छू मंतर', पाहा व्हिडिओ
  2. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान ऐश्वर्या राय पती अभिषेक बच्चनबरोबर झाली स्पॉट, आराध्याच्या परफॉर्मन्सचा लुटला आनंद
  3. अभिषेक पत्नी ऐश्वर्या रायबरोबर दुसऱ्या मुलाची प्लॅनिंग करत आहे का? प्रश्न ऐकून ज्युनियर बच्चन लाजला...
Last Updated : Feb 5, 2025, 3:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details