महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चनच्या घटस्फोटाची बातमी 'छू मंतर', पाहा व्हिडिओ - ABHISHEK AND AISHWARYA RAI TOGETHER

नवीन वर्ष एकत्र साजरे करून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासह परतले आहेत.

Abhishek Bachchan and Aishwarya Rai
अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन ((ANI))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 4, 2025, 12:33 PM IST

मुंबई - अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या काही महिन्यांपासून सुरू होत्या. यावर दोघांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनीही कोणतीही प्रतिक्रिया न दिल्यामुळं या चर्चेला उधाण आलं होतं. यादरम्यान अनेकांनी ट्रोल करुन त्यांच्यावर संशय व्यक्त केला होता. आता या सर्वांची तोंड या जोडप्यानं बंद केली आहेत. अभिषेक, ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या तिघंही नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अज्ञातस्थळी रवाना झाले होते. ते जेव्हा आज विमानतळावर एकत्र परतले तेव्हा त्यांना पाहून चाहत्यांना तर आनंद झालाच परंतु, त्यांना ट्रोल करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या.

अभिषेक आणि ऐश त्यांच्या मुलीसह विमानतळावर स्पॉट दिसले. तिघेही नवीन वर्ष एकत्र साजरे करून परतले असताना ते मुंबई विमानतळावर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले. या जोडप्याचा मुलीबरोबरचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करून परतले ऐश-अभिषेक

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अभिषेक ब्लॅक लोअर आणि ग्रे हूडीमध्ये दिसत आहे तर ऐश ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. अभिषेक आणि ऐशची लाडकी मुलगी आराध्याबद्दल बोलायचं तर ती राखाडी पँटसह निळ्या रंगाच्या हुडीमध्ये दिसत आहे. तिघेही मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यांना एकत्र पाहून चाहत्यांच्या आनंदाला सीमा उरलेली नाही.

आता अभिषेक-ऐशच्या चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. दोघांना एकत्र पाहून एका चाहत्याने लिहिले, 'पॅचअप ऑन न्यू इयर'. दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं आहे की, 'जोपर्यंत तुम्हाला संपूर्ण कहानी कळत नाही तोपर्यंत कोणाच्या तरी नातेसंबंधावर शंका घेणे थांबवा.' तिसऱ्या चाहत्यानं लिहिलं आहे की, 'हे दोघे एकत्र चांगले दिसतात'. चौथा चाहता लिहितो, त्यांचे कुटुंब चिरंतन आनंदी राहो, या छोट्या कुटुंबाला एकत्र पाहून मला खूप आनंद झाला.

अभिषेक आणि ऐशच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी या जोडप्याला वारंवार अडचणीत आणले आहे, परंतु ऐश आणि अभिषेकने वेळोवेळी ट्रोल करणाऱ्यांना फारसं महत्त्व दिलेलं नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details