मुंबई - Aayush Sharma's Ruslaan Teaser OUT : अभिनेता सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मा गेल्या वर्षभरापासून त्याच्या 'रुस्लान' या ॲक्शन चित्रपटामुळे खूप चर्चेत होता. या चित्रपटाची घोषणा 19 एप्रिल 2023 रोजी करण्यात आली होती. याशिवाय 23 फेब्रुवारीला या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. आता आज 12 मार्च रोजी चित्रपटाचा प्री- टीझर रिलीज करण्यात आला आहे. यापूर्वी 'रुस्लान' चित्रपटातील आयुषचे मोशन पोस्टर रिलीज झाले होते, ज्यामध्ये तो सूट आणि बूट घालून हातात गिटार घेऊन उभा दिसत होता. आयुष शर्मा या चित्रपटामध्ये अॅक्शन करताना दिसणार आहे.
'रुस्लान' चित्रपटाचा प्री-टीझर रिलीज : 'रुस्लान' चित्रपटामध्ये साऊथ चित्रपटांचा खलनायक जगपती बाबूही दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण ललित भुतानी यांनी केलं आहे. 'रुस्लान'चा टिझर 1.34 मिनिटांचा आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये आयुष अॅक्शन आणि स्टंट करत आहे. याशिवाय आयुष शर्मा स्टारर या चित्रपटामध्ये सोनाक्षी सिन्हाचा कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बाल देखील दिसणार आहे. 'रुस्लान'च्या टीझरमध्ये फक्त एक डायलॉग ऐकायला मिळतो, हारायला काही नाही, जिंकण्यासाठी सारे जग आहे आणि यासोबतच टीझर संपतो. 'रुस्लान' चित्रपटात अभिनेत्री सुश्री मित्रा असणार आहे.