महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Salman Khan : सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमधून लॉरेन्स बिश्नोईच्या नावे कॅब बुक करणाऱ्या तरुणाला अटक - Salman Khan - SALMAN KHAN

एक तरुणाने सलमान खानच्या घरातून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने कॅब बुक केली होती. रविवारी त्याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी अपार्टमेंटबाहेर कडक बंदोबस्त तैनात केला असताना ही बाब समोर आली आहे.

Salman Khan
सलमान खान

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 11:09 AM IST

मुंबई - हिंदी चित्रपटांचा सुपरस्टार सलमान खानच्या घरातून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं कॅब बुक करणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे राहणाऱ्या 20 वर्षाच्या रोहित त्यागी यानं ही कार भाड्यानं बुक केली होती.

"जेव्हा कॅब ड्रायव्हर गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खानच्या घरी पोहोचला आणि त्यानं तिथल्या वॉचमनला लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं बुकिंगबद्दल विचारलं, तेव्हा आधी चकित झालेल्या वॉचमननं लगेच जवळच्या वांद्रे पोलिस स्टेशनला बुकिंगची माहिती दिली," असा दावा पोलिसांकडून करण्यात आला. यावर कारवाई करत मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी कॅब चालकाची चौकशी करून ऑनलाइन वाहन बुक करणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळवली.

"ज्या व्यक्तीने कॅब बुक केली तो गाझियाबादचा 20 वर्षांचा विद्यार्थी होता, त्याचे नाव रोहित त्यागी आहे," असं पोलिसांनी पुढे सांगितले. पोलिसांना चौकशीदरम्यान असं आढळून आलं की आरोपींनी लबाडी म्हणून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं कॅब बुक केली होती. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून अटक केल्याचंही पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर त्याला मुंबईत आणून कोर्टात हजर केलं असता त्याला दोन दिवसांची वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी मंगळवारी कच्छ पोलिसांनी सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेऊन मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले. आरोपी विकी गुप्ता (24) आणि सागर पाल (21) यांना वैद्यकीय चाचणीनंतर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

विकी आणि सागर हे दोघेजण एका मोटारसायकलवरून आले आणि रविवारी पहाटे ५ वाजता सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर चार फेऱ्या मारल्या आणि निघून गेले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसून आलंय की दोन्ही आरोपींनी फेटे घातले होते आणि बॅकपॅक बरोबर नेले होते. या व्हिडिओमध्ये ते सलमानच्या निवासस्थानाच्या दिशेनं गोळीबार करताना दिसत आहेत. आरोपींच्या अटकेनंतर, कच्छचे डीएसपी एआर झंकांत यांनी सांगितले की, सुरुवातीच्या तपासात ते लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होते.

विशेष बाब म्हणजे, गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या धमक्यांमुळे सलमानची सुरक्षा पातळी नोव्हेंबर 2022 पासून Y-Plus लेव्हलवर श्रेणीसुधारित करण्यात आली आहे. सलमानला वैयक्तिक पिस्तूल बाळगण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे आणि अतिरिक्त सुरक्षेसाठी त्यानं नवीन बुलेट प्रूफ कारदेखील खरेदी केली आहे.

हेही वाचा -

  1. 'वॉर 2'च्या मुंबईतील सेटवर फ्रेंच कॉन्सुल जनरलने घेतली हृतिक रोशनची भेट, 'आदरातिथ्याबद्दल' मानले आभार - Hrithik Roshan
  2. बॉलिवूड पदार्पणाच्या 'महाराजा' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी जुनैद खानच्या 'एक दिन' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण - Junaid Khan
  3. आदिल हुसैनची 'कबीर सिंग'वर कडवट टीका, संदीप रेड्डी वंगाच्या टीकेनंतरही हुसैन आपल्या मतावर ठाम - Sandeep Reddy Vanga

ABOUT THE AUTHOR

...view details