मुंबई :भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चनपासून ते अल्लू अर्जुनपर्यंत, अनेक स्टार्सनी आपल्या शूर सैनिकांच्या बलिदानाची आठवण करत पोस्ट शेअर केल्या आहेत. हा दिवस देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी विशेष आहे.
प्रजासत्ताक दिननिमित्त अमिताभ बच्चनपासून ते महेश बाबूपर्यंत 'या' बॉलिवूड-साऊथ सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा... - 76TH REPUBLIC DAY
अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, अल्लू अर्जुन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
By ETV Bharat Entertainment Team
Published : Jan 26, 2025, 4:28 PM IST
बॉलिवूड स्टारनं दिल्या शुभेच्छा : बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांनी एक्सवर प्रजासत्ताक दिनानिमित्त लिहिलं, 'प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा.' दरम्यान अक्षय कुमारनं एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यानं प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि आपल्या शूर सैनिकांच्या बलिदानाला आदरांजली वाहिली. त्यानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'स्वातंत्र्य हा केवळ आपला हक्क नाही तर, ती आपली जबाबदारी देखील आहे. कालच्या बलिदानामुळेच आपण आज मुक्त आहोत. चला तर या स्वातंत्र्याचा सन्मान करूया आणि भारताला नवीन उंचीवर घेऊन जाऊया. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.' याशिवाय प्रियांका चोप्रानं देखील पोस्ट शेअर करून इंस्टाग्रामवर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच करण जोहरनं प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना लिहिलं 'धर्मा प्रोडक्शनकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.'
साऊथ स्टारानं दिल्या शुभेच्छा :तेलुगू अभिनेताअल्लू अर्जुननं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मल्याळम स्टार मोहनलाल यांनी प्रजासत्ताक दिवशी देशभक्तीचा संदेश देत लिहिलं, 'भूतकाळाचा आदर करणे, वर्तमान साजरा करणे आणि एका मजबूत उद्यासाठी काम करणे, प्रत्येक प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवण करून देतो की, भारताची खरी ताकद तिथे राहत असलेल्या लोकांमध्ये आहे. एकत्रितपणे या प्रवासाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. जय हिंद.' तसेच समांथा रूथ प्रभूनं प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना लिहिले की, 'देशभक्तीची सुरुवात सर्वात लहान मनापासून होते.' याशिवाय महेश बाबू, सिद्धार्थ मल्होत्रा, ज्युनियर एनटीआर, अनुष्का शर्मा, शाहिद कपूर, आलिया भट्ट, शिल्पा शेट्टी कियारा अडवाणी यांसारख्या कलाकारांनीही सोशल मीडियाद्वारे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.