मुंबई -दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेमी युगुलांसाठी खास दिवस असतो. व्हॅलेंटाईन डे या दिवशी साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. भारतात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची सुरुवात 1992 च्या सुमारास झाली. त्यानंतर हा एक ट्रेंड सुरू झाला. व्हॅलेंटाईन डे हा दिवस अमेरिकेत सेंट व्हॅलेंटाईनच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जात होता. यानंतर इंग्लंडमध्ये साजरा करण्यात आला. तसेच हळूहळू हा दिवस जगभरात साजरा केल्या जाऊ लागला. अनेक देशांमध्ये या दिवसाचे वेगवेगळे नाव आहे. आज या विशेष प्रसंगी तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर मराठी चित्रपट पाहूण हा दिवस साजरा करू शकता.
1 'सैराट' चित्रपट : 'सैराट' चित्रपटाची कहाणी आर्ची आणि पार्श्या या दोन प्रेमी युगुलांच्या प्रेमाभोवती फिरणारी आहे. आर्ची ही एका श्रीमंत कुटुंबातील एक दृढ इच्छाशक्ती असलेली मुलगी असते. तसेच पार्श्या हा कनिष्ठ जातीचा कष्टाळू मुलगा असून तो आर्चीच्या प्रेमात पडतो. सामाजिक रूढी आणि कुटुंबाच्या विरोधाविरुद्ध जाऊन ते दोघेही विवाह करतात, यानंतर या कहाणीचा अंत खूप भयानक होतो. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं आहे. 'सैराट' चित्रपटात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे कालाकर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 'झी 5' उपलब्ध आहे.
2 मुंबई-पुणे-मुंबई चित्रपट :या चित्रपटात एक आत्मविश्वासू मुंबईची मुलगी भावी वराला भेटण्यासाठी पुण्याला येते. जेव्हा ती काही स्थानिक मुलाला रस्ता विचारते, तेव्हा एक मुलगा तिला रस्ता सांगतो, यानंतर ते दोघेही एक दिवस एकत्र घालवतात. फिरत असताना दोघेही प्रेमाबद्दल संवाद करतात, यानंतर हे दोघेही प्रेमात पडतात. या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या कलाकारांनी मुख्य भूमिकेत काम केलं आहे. 'मुंबई-पुणे-मुंबई' चित्रपटाचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं आहे. हा चित्रपट तुम्ही अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.