महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

पाच धमाकेदार चित्रपटांसह होणार 2024 ची सांगता, डिसेंबरमध्ये रिलीज होणार हे उत्तम चित्रपट - MOVIES TO RELEASE IN DECEMBER

यंदाच्या डिसेंबर महिन्यात मनोरंजनाची मोठी पर्वणी प्रेक्षकांसाठी मिळणार आहे. या पाच मोठ्या चित्रपटांसह 2024 समाप्त होणार आहे.

MOVIES TO RELEASE IN DECEMBER
डिसेंबरमध्ये रिलीज होणार चित्रपट (movie posters)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 30, 2024, 3:27 PM IST

मुंबई - 2024 या सालाचा शेवटचा महिना डिसेंबर सुरू होत आहे. यंदाचं वर्ष बॉक्स ऑफिसवर खूप हिट ठरणार आहे, कारण 2024 च्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये 'पुष्पा 2' पासून 'बेबी जॉन'पर्यंत अनेक बॉलिवूड आणि साउथचे भव्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकणार आहेत. सध्या 'भूल भुलैया 3', 'सिंघम अगेन', 'कांगुवा' आणि 'आय वॉन्ट टू टॉक' बॉक्स ऑफिसवर कामगिरी करत आहेत. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन अभिनीत 'पुष्पा 2' हा बहुप्रतिक्षित अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. डिसेंबरमध्ये अनेक इतर चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत, मात्र हे 5 मोठे चित्रपट डिसेंबरमध्ये मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत. याबरोबरच डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची यादी पाहूया.

'पुष्पा 2 : द रुल'

2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक म्हणजे अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची भूमिका असलेला 'पुष्पा 2 : द रुल'. हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. 'पुष्पा 2'च्या प्रमोशनचे काम वेगानं सुरू आहे. यावेळी सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2 : द रुल' या चित्रपटात 'पुष्पराज' आपल्या शत्रूंवर राज्य करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगलाही परदेशात सुरुवात झाली असून भारतातही लोक प्रतीक्षेत आहेत.

‘झिरो से रीस्टार्ट’

विक्रांत मॅसी स्टारर '१२वी फेल' या चित्रपटाच्या यशानंतर आता ‘झिरो से रीस्टार्ट’ हा चित्रपटही २०२४ च्या शेवटच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाची रिलीज डेट 13 डिसेंबर असल्याचं सांगण्यात येत आहे. नुकतेच 'चल झिरो पर चलते हैं' चित्रपटाचे गाणे रिलीज झाले आहे. या चित्रपटात विक्रांत मॅसीसोबत त्याचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा देखील दिसणार आहेत.

'विदुथलाई भाग २'

दक्षिण चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता विजय सेतुपतीचा 'विदुथलाई पार्ट 2' या पीरियड क्राईम चित्रपट 2024 च्या शेवटी रिलीज होणार आहे. 'विदुथलाई पार्ट २' हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वैत्रीमारन यांनी केलं आहे. 'विदुथलाई पार्ट 1' चित्रपटाच्या यशानंतर आता याचा सीक्वेल प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे.

'मुफासा - द लायन किंग'

शाहरुख खान, आर्यन खान आणि अबराम खान यांच्या आवाजातील 'मुफासा - द लायन किंग' हा साहसी अ‍ॅनिमेशन ड्रामा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. 'मुफासा' हिंदी तसेच इंग्रजी, तमिळ आणि तेलगूमध्ये डब करण्यात आला आहे. 'मुफासा - द लायन' किंग बॅरी जेनकिन्स यांनी तयार केला आहे.

'बेबी जॉन'

बॉलिवूड स्टार वरुण धवनच्या 'बेबी जॉन' या चित्रपटासह 2024 वर्ष संपणार आहे. शाहरुख खानच्या जवान या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या दिग्दर्शकानं प्रेजेन्ट केलेला हा अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. 'बेबी जॉन'चे दिग्दर्शन कॅलिस यांनी केले असून या चित्रपटात वरुण धवनबरोबर वामिका गब्बी आणि कीर्ती सुरेश या अभिनेत्री दिसणार आहेत. 'बेबी जॉन' या चित्रपटाच्या पोस्टर्स आणि टीझर्सने अ‍ॅटलीच्या चाहत्यांची उत्सुकता आधीच वाढवली आहे. 'बेबी जॉन' हा सुपरस्टार विजयच्या 'थेरी' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या इतर चित्रपटांची यादी...

  • वनवास (२० डिसेंबर) हिंदी
  • रोबिहुड (२० डिसेंबर) तेलुगु
  • मार्को (२० डिसेंबर) मल्याळम
  • यूआय (डिसेंबर २०) कन्नड
  • कमाल (२५ डिसेंबर) तमिळ
  • बरौज (२५ डिसेंबर) मल्याळम

ABOUT THE AUTHOR

...view details