मुंबई - Mardaani 3 Announcement: बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी स्टारर 'मर्दानी'च्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. यशराज फिल्म्सनं' मर्दानी' फ्रँचायझीला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'मर्दानी'च्या तिसऱ्या भागाची घोषणा करून राणीच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. राणी मुखर्जी पुन्हा एकदा मुंबई क्राइम ब्रँचच्या सीनियर इन्स्पेक्टर शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'मर्दानी'च्या तिसऱ्या भागाची घोषणा केल्यानंतर यशराज फिल्म्सनं एक व्हिडिओही शेअर केला आहे. 'मर्दानी' आणि 'मर्दानी 2'मध्ये राणीचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला होता. आता 'मर्दानी'च्या तिसऱ्या भागाची घोषणा झाल्यानंतर अनेकजण राणीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर आहेत.
राणी मुखर्जीचा 'मर्दानी'चा तिसरा भाग : 2014 मध्ये यशराज फिल्म्सनं 'मर्दानी' हा चित्रपट निर्मित केला होता. यानंतर पाच वर्षांनी 'मर्दानी 2' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. आता पुन्हा एकदा पाच वर्षांनंतर 'मर्दानी' फ्रॅंचायझीचा तिसरा भाग चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यशराज फिल्म्सनं एक व्हिडिओ शेअर केला, यात 'मर्दानी 'आणि 'मर्दानी 2' मधील काही सीन्स दाखविण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये राणी ही तिच्या डॅशिंग कॉप लूकमध्ये ॲक्शन करताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी 'मर्दानी' फ्रॅंचायझीच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाबद्दल यशराज फिल्म्सनं लिहिलं, "मर्दानी'ला 10 वर्षे पूर्ण झाली आणि पुढील चित्रपटाची वाट आहे, डेअरिंग शिवानी शिवाजी रॉय आणि 'मर्दानी'ला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उत्सव साजरा करत आहोत, एक दशक इतके प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. या प्रेमासाठी आम्ही आभारी आहोत, यामुळे आम्हाला एकदा पुन्हा प्रेरणा मिळाली आहे."