छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडच्या प्रत्यक्ष कामाला मार्च महिन्यात सुरुवात झाली आहे. त्याबाबत बुधवारी अधिकृत घोषणा करण्यात आली. सध्या 1 हजार व्हील तयार होत आहे. लवकरच 5 हजार इतकी क्षमता करण्यात येईल. भारत सरकारला तसेच बाहेरील देशांमधे चाकांची निर्यात करण्यात येईल. जवळपास 600 जणांना रोजगार निर्माण होणार असून कोट्यावधींची गुंतवणूक या निमित्ताने करण्यात येणार असल्याची माहिती संचालक विकाश लोहिया यांनी दिली.
रेल्वेच्या चाकाचे छत्रपती संभाजीनगरात उत्पादन, विदेशात होणार निर्यात - Business news in Marathi - BUSINESS NEWS IN MARATHI
छत्रपती संभाजीनगर शेंद्रा औद्योगिक वसाहतीत रेल्वेची चाके म्हणजेच व्हील आणि चेसिस तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला. ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड (जेडब्ल्यूएल) कंपनीनं तात्रावॅगोंका ए. एस. यांच्यासोबत भागीदारी करत ज्युपिटर तात्रावॅगोंका रेलव्हील फॅक्टरी या नव्या कारखान्याचं उद्घाटन झाले.
Published : Sep 19, 2024, 11:02 AM IST
पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे व्हील-बोनाट्रान्सचे अधिग्रहण केल्यानंतर जेडब्ल्यूएल रेल्वे रोलिंग स्टॉक उत्पादन क्षेत्रात आघाडी असलेला कारखाना मानला जातो. ज्युपिटर तात्रावॅगोंका रेलव्हील फॅक्टरी ही स्थानिक वापरासाठी आणि निर्यातीसाठी दोन्ही प्रकारच्या व्हीलसेट्सचे उत्पादन करणारी भारतातील पहिला कारखाना आहे. भारताचे आयात व्हीलसेट्सवर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी, तसेच भारतीय रेल्वे उद्योगक्षेत्र आणि जागतिक बाजारपेठेतील वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. "सध्या व्हील सेट तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आयात केला जात असला तरी लवकरच पूर्ण सामग्री देशातच तयार होणार आहे," असा विश्वास संचालक विकाश लोहिया यांनी व्यक्त केला.
व्हील तयार करण्याचा प्रकल्प महत्त्वाचा-ज्युपिटर वॅगन्सनं शुलर इंडियासोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा करण्यात आली आहे. या भागीदारीच्या माध्यमातून अत्याधुनिक फोर्जिंग मशीनरी पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे कारखान्याची क्षमता वाढेल. रेल्वे उद्योगक्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्मिती केंद्र म्हणून त्यांची भूमिका अधिक भक्कम होईल. या सहयोगातून स्थानिक मागणी आणि वाढत्या निर्यात संधी या दोन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी जेएसडब्ल्यूएलचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड, तात्रावॅगोंका ए.एस. आंद्रित्झ आणि शुलर इंडिया यांचे वरिष्ठ नेतृत्व एकत्रित आले होते. या भागीदारीचे महत्त्व आणि भविष्यातील वाढीच्या संधींवर भर दिला जाणार आहे, अशी माहिती ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विवेक लोहिया यांनी दिली.
सर्व परवानग्या मिळाल्यानं उत्पादन सुरू-"या वर्षाच्या सुरुवातीला केलेले बोनाट्रान्सचे अधिग्रहण हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. यामुळे आम्हाला रेल्वेच्या सुट्या भागांसाठी एकात्मिक पुरवठा साखळी तयार करण्यास आम्ही सक्षम झालो. ज्युपिटर तात्रावॅगोंका रेलव्हील फॅक्टरीची स्थापना करण्यात आली. फार पूर्वीपासून, भारत या महत्त्वपूर्ण घटकांसाठी आयातीवर अवलंबून होता. परंतु या प्रकल्पामुळे आता आम्ही हे घटक देशांतर्गत पातळीवर मोठ्या प्रमाणात तयार करू शकतो. त्यामुळे खर्च अधिक प्रभावीपणे नियंत्रित करता येईल. पुरवठा साखळीची सुरक्षा वाढणार आहे. भारतात स्वतंत्र आणि मोठ्या प्रमाणावर वाढू शकणारी रेल्वे उत्पादन इकोसिस्टीम तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सर्व आवश्यक परवाने आणि प्रमाणपत्रे आधीच मिळालेली असल्यामुळे हा प्रकल्प भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित प्रकल्पांसाठी योगदान देण्यासाठी सक्षम आहे. हे उद्घाटन भारतातील रेल्वे व्हील आणि ॲक्सल उत्पादनाच्या क्षेत्रात आघाडीवर राहण्याचा आमचा निर्धार आहे," असे ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विकाश लोहिया यांनी सांगितलं.