मुंबई- 'अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याची भारतीयांमध्ये परंपरा आहे. अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधी देशात सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत गुरुवारी प्रति 10 ग्रॅम म्हणते प्रति तोळा 72,390 रुपये राहिली. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 66,360 रुपये होती.
लग्नाच्या हंगामामुळे किंवा अक्षय्य तृतीयेसारख्या सणानिमित्त देशात सोन्याची मागणी वाढते. मात्र गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. सोन्याच्या दरात प्रति तोळा 200 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी चांदीचीही बाजारात मागणी वाढली. चांदीचा दर 85,100 रुपये प्रति किलोवर पोहोचला.
गुरुवारी ( 10 मे रोजी) सोन्याचे दर काय होते?
- दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,510 रुपये होता. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,540 रुपये होता. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,360 तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,390 रुपये राहिली. अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,410 रुपये आहे. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,440 रुपये होती. कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,360 रुपये, त्याच वेळी 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,390 रुपये राहिली. लखनौमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,510 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,540 रुपये राहिला. हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,360 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,390 रुपये राहिला.
आज सोन्याचे काय दर आहेत?
- मुंबईत आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति तोळा 66,140 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति तोळा 72,150 रुपये दर आहे. पुण्यात आज 22 कॅरेट सोन्यासाठी 66,140 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा 72,150 रुपये प्रति तोळा दर आहे. नागपुरात आज 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति तोळा 66,140 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति तोळा 72,150 रुपये दर आहे. दिल्लीत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,290 रुपये आणि 24 कॅरेट सोन्यासाठी प्रति तोळा 72,300 रुपये दर आहे. कोलकाता येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 66,140 रुपये आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 72,150 रुपये प्रति तोळा आहे. हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याची किंमत 66,140 रुपये आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 72,150 रुपये प्रति तोळा आहे. अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 66,190 रुपये आणि 24 कॅरेट सोन्यासाठी प्रति तोळा 72,200 रुपये आहे.
सोने खरेदी का केली जाते?अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणतेही नवीन कार्य सुरू केले तर ते कोणत्याही अडथळ्याशिवाय यशस्वी होते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे आजच्या दिवशी नवीन व्यवसाय किंवा मोठे कार्य हाती घेतले जाते. सोने खरेदी करणं शुभ मानले जाते. सोने खरेदी केल्यानं आर्थिक प्रगती होते, असं मानलं जातं. हिंदू संस्कृतीत महालक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करून सोने-चांदीचे दागिने खरेदी केली जाते. अक्षय्य तृतीयेला जे लोक सोने खरेदी करतात, त्यांच्या घरात कधीही आर्थिक पैसे आणि धान्याची कमतरता भासत नाही, असं मानलं जातं. त्यामुळे अनेकजण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी विशेष आवर्जून सोने खरेदी करतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आज पहाटे 5:33 ते दुपारी 12:17 पर्यंत सोने, चांदी, दागिने आणि इतर वस्तू खरेदी करण्याचा शुभकाळ असल्याचे पंडित सांगतात.
हेही वाचा-
- ऐन लग्नसराईत सोन्याला झळाळी; सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा मोठी वाढ... - GOLD RATE IN INCREASED
- अक्षय्य तृतीयेला करा 'या' गोष्टींचं दान, होईल विशेष फलप्राप्ती! - Akshaya Tritiya 2024
- 'अक्षय्य तृतीया'च्या मुहूर्तावर का खरेदी करतात सोनं? वाचा सविस्तर इतिहास - Akshaya Tritiya 2024