महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भयंकर! कौटुंबिक वादातून महिलेसह तीन मुलींची निर्घृण हत्या; घटनेनंतर पती फरार - Murder in Motihari

Murder in Motihari : बिहारमधील मोतिहारी इथं कौटुंबिक वादातून पतीनं पत्नी आणि तीन मुलींची कुऱ्हाडीनं वार करुन निर्घृण हत्या केली. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरला असून घटनेनंतर आरोपी फरार आहे

भयंकर! बिहारच्या मोतिहारीमध्ये कौटुंबिक वादातून महिलेसह तीन मुलींची निर्घृण हत्या; घटनेनंतर पती फरार
भयंकर! बिहारच्या मोतिहारीमध्ये कौटुंबिक वादातून महिलेसह तीन मुलींची निर्घृण हत्या; घटनेनंतर पती फरार

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 29, 2024, 11:41 AM IST

मोतिहारी (बिहार) Murder in Motihari : बिहारमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. बिहारच्या मोतिहारीमध्ये एक महिला आणि 3 मुलींसह 4 जणांची निर्घृण हत्या झाल्यानं खळबळ उडालीय. महिलेच्या पतीनं तीन मुली आणि पत्नीची कुऱ्हाडीनं गळा कापून हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मृत महिलेचा पती फरार आहे. त्यामुळं या घटनेमागं पतीचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

मोतिहारीमध्ये एकत्र 4 जणांची हत्या : गुरुवारी रात्री घरात काही कारणावरुन वाद झाल्याचं बोललं जातंय. या वादाचा पतीला राग आला. यामुळंच त्यानं हत्याकांड घडविल्याचं बोललं जातंय. रात्री पत्नी आणि मुली झोपेत असताना आरोपीनं त्यांची हत्या केलीय. या हत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हा वाद कशामुळं झाला आणि कशाची चर्चा झाली, हे ही समजू शकलं नाही. मोतिहारीच्या पहारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बावरिया गावात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच डीएसपी रंजन कुमार यांच्यासह अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस गावात पोहोचले आहेत.

आरोपी पती फरार : एकाच कुटुंबातील 4 जणांच्या हत्येच्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरलाय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलंय. पोलीस घटनास्थळी सर्व पुरावे गोळा करत आहेत. प्रथमदर्शनी हे संपूर्ण प्रकरण कौटुंबिक वादाचं असल्याचं बोललं जातंय. मृतांचे मृतदेह शवविच्छेदवनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांचा तपास सुरू आहे. या संपूर्ण खून प्रकरणाची माहिती पोलीस काही वेळात देणार आहेत. त्यानंतर घटनेबाबत अधिक माहिती समोर येणार आहे.

हेही वाचा :

  1. राजस्थानात रक्तरंजित 'होळी'; पोलिसात तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या पाच जणांची डंपरनं चिरडून हत्या - Murder In Jhalawar
  2. उत्तराखंडमधील नानकमट्टाच गुरुद्वारा प्रमुखाची हत्या; तीन महिन्यांत दोन धर्मगुरूची हत्या - Baba Tarsem Singh Murder
  3. Abhishek Ghosalkar Murder Case : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करा; विनोद घोसाळकर यांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details