महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

निवडणूक निकालाआधीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पडल्या - Mamata Banerjee collapsed - MAMATA BANERJEE COLLAPSED

Mamata Banerjee Collapsed : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हेलिकॉप्टरमध्ये चढताना किरकोळ जखमी झाल्या आहेत. लोकसभा प्रचारासाठी त्या आसनसोलजवळील कुल्टी येथे जात होत्या. त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये चढताना त्यांचा पाय घसरला. त्यामुळं त्यांना किरकोळ दुखापत झाली.

Mamata Banerjee collapsed
Mamata Banerjee collapsed

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 9:23 PM IST

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्ये चढताना कोसळल्या

दुर्गापूर Mamata Banerjee Collapsed : दुर्गापूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री जात असताना त्यांना किरकोळ दुखापत झाली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुर्गापूरमध्ये होत्या. तिथून दुसऱ्या निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी ममता बॅनर्जींचा हेलिकॉप्टरमध्ये चढताच पाय घसरला. त्यामुळं त्यांना किरकोळ दुखापत झालीय. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.

बॅनर्जी किरकोळ जखमी : मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुर्गापूरहून आसनसोलला रवाना झाल्या. टीएमसीच्या सूत्रांनी सांगितलं की, त्यांना फारशी गंभीर दुखापत झाली नाहीय. त्या आसनसोलला पक्षाच्या निवडणूक रॅलीला संबोधित करणार होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांना दुखापत झाली होती. घरात चालत असताना त्या पाय घसरून पडल्या होत्या. त्यामुळं त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यांना तातडीनं एसएसकेएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. तिथं उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं होतं.

विधानसभा निवडणुकीतही झाला होता अपघात : यापूर्वी 2021 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्या नंदीग्राममध्ये प्रचारासाठी गेल्या होत्या. तेथील गर्दीत झालेल्या हाणामारीत ममता बॅनर्जी जखमी झाल्या होत्या. टीएमसीनं रेयापारा येथील मंदिराबाहेर घडलेल्या या घटनेच्या पाठीमागं भाजपाचा हात असल्याचं म्हटलं होतं. त्याचवेळी भाजपानं ममता बॅनर्जींवर लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी जखमी झाल्याचं नाटक केल्याचा आरोप केला होता. पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी व्हील चेअरवर बसून प्रचार केला होता.

पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यात मतदान : पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होत आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मतदान झालं असून, इतर पाच टप्प्यांचं मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपा, टीएमसी, काँग्रेस या प्रमुख पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. आरोप, प्रत्यारोपानं राजकीय वातावरण ढवळून निघालंय.

हे वाचलंत का :

  1. CM Mamata Banerjee Injury : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घसरुन पडल्या; डोक्याला गंभीर दुखापत, प्रार्थना करण्याचं पक्षाचं आवाहन
  2. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील साक्षीदाराकडून ममता बॅनर्जींच्या पुतण्याच्या घराची रेकी; कोलकाता पोलिसांनी केली अटक - Kolkata Police Arrested Mumbai Man
  3. Mamata Banerjee Opposed To CAA : जीव गेलातरी बेहत्तर . . मात्र बंगालमध्ये सीएए लागू होऊ देणार नाही; ममता बॅनर्जी कडाडल्या

ABOUT THE AUTHOR

...view details