महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महाराष्ट्रातील दोन नेते दिल्लीत घडवणार भूकंप? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट, फडणवीसांची संघ नेतृत्वासोबत बैठक - Vinod Tawde meets Amit Shah - VINOD TAWDE MEETS AMIT SHAH

Vinod Tawde Meets Amit Shah : महाराष्ट्रातील पराभवावर भाजपाचं दिल्लीत मंथन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या आधी विनोद तावडे अमित शाहांच्या भेटीला पोहचले होते. फडणवीस यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दोघांच्या भेटीनं भाजपात मोठा भूकंप होणार, अशी चर्चा आहे.

Vinod Tawde
विनोद तावडे (फाईल फोटो)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 5:37 PM IST

Updated : Jun 6, 2024, 10:02 PM IST

मुंबई Vinod Tawde Meets Amit Shah:महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी घेतली. ते दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. मात्र, या भेटीपूर्वीच भाजपा नेते विनोद तावडे अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले होते. फडणवीस यांची संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन जवळ-जवळ दोन तास चर्चा केल्याचं वृत्त आहे. त्यामुळे दिल्लीत ते काय निरोप घेऊन जातात ते पाहावं लागेल.

पराभवावर आत्मचिंतन :केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेश तसंच महाराष्ट्रातून जातो, असं म्हटलं जातं. परंतु या दोन राज्यातच भाजपाला पराभवाला सामोरं जावं लागलं. उत्तर प्रदेशमध्ये 2019 मध्ये 62 जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदा फक्त 33 जागांवर समाधान मानावं लागलं. मात्र, निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रात महायुतीनं 45 पारचा नारा दिला होता. परंतु त्यांना केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं. उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रातसुद्धा भाजपाला धक्का बसला. त्यातून सावरायला भाजपा नेत्यांना फार उशीर लागणार आहे. परंतु या पराभवाचं सखोल चिंतन केलं जाणार असून देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची पूर्ण जबाबदारी घेतलीय. तसंच त्यांनी सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती केली आहे. त्यामुळं आज देवेंद्र फडणवीस सायंकाळी दिल्ली दरबारी जाणार आहेत. तिथं देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन पराभवावर विश्लेषण करणार आहेत. दिल्लीला जाण्यापूर्वी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानं फडणवीस दिल्लीत गेल्यावर संघाचा सल्लाही मोदी-शाह यांना सांगतील यात शंका नाही.

विनोद तावडे यांच्या भेटीनं भुवया उंचावल्या :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदावरुन दूर होण्याची भूमिका घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना दिल्लीला बोलावलंय. त्यापूर्वीच भाजपा सरचिटणीस विनोद तावडे यांनी अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन महाराष्ट्रातील झालेल्या पराभवावर सविस्तर चर्चा केली. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे मागील काही काळापासून विनोद तावडे यांचं केंद्रातील वजन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय. विनोद तावडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात आली होती. ती त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडलीय. त्यामुळं विनोद तावडे यांच्यावर पक्ष श्रेष्ठींचा विश्वास दुणावला आहे. अशात महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर भाजपामध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

मोदींच्या सभेचा परिणाम नाही :देवेंद्र फडणवीस उशिरा सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतील. या भेटीत राज्यातीस झालेल्या पराभवावर चर्चा करण्यात येणार आहे. केंद्रातील तीन मंत्र्यांनाही महाराष्ट्रात पराभवाला सामोरं जावं लागलय. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, नवनीत राणा यांचाही पराभव झालाय. विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या मतदारसंघांमध्ये उमेदवारांचा प्रचार केला, त्यापैकी 13 उमेदवारांचा पराभव झाला आहे. इतकंच नाही, तर मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाटकोपरमध्ये एकमेव रोड शो केला होता. तिथंही भाजपा उमेदवार मिहिर कोटेचा यांचा पराभव झालाय. यावर विचारमंथन करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान भाजपा सरचिटणीस विनोद तावडे उपस्थित राहतात का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हे वचालंत का :

  1. महाराष्ट्राच्या 13 आमदारांनी आजमावलं लोकसभेत नशीब; तब्बल सात आमदारांना लागली खासदाराची लॉटरी - MLA Won In Lok Sabha Election Result 2024
  2. विकासाचे महामेरू नितीन गडकरी; महामार्ग, उड्डाणपूल, खडेबोल: काय आहे नागपूरचा गड राखणाऱ्या गडकरींच्या विजयाचं गमक - Nagpur Lok Sabha Result 2024
  3. राज्यातील जनतेनं दडपशाहीला नाकारले आहे-सुप्रिया सुळे - INDIA bloc Vs NDA
Last Updated : Jun 6, 2024, 10:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details