महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

२०० मीटर खोल दरीत कोसळली चारचाकी : ८ नेपाळी मजुरांचा मृत्यू, २ गंभीर जखमी - Uttarakhand road accident - UTTARAKHAND ROAD ACCIDENT

उत्तराखंडमध्ये भीषण रस्ते अपघात झाला. नैनीताल जिल्ह्यात चारचाकी दरीत कोसळून हा अपघात झाला. या अपघातात ८ लोकांचा मृत्यू झाला.

betalghat accident
betalghat accident

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 9, 2024, 10:38 AM IST

नैनीताल- उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यात असलेल्या वेताळघाट येथं चारचाकी दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात वाहनामधील ८ जणांचा मृत्यू झाला. चारचाकीत १० जण प्रवासी करत होते. अपघातामधील दोन नेपाळी मजुरांची प्रकृती गंभीर आहे. राजेंद्र कुमार असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.

वेताळघाट हा दुर्गम भाग असल्यानं रात्रीच्या वेळी मदतपथकाला घटनास्थळी पोहोचण्याकरिता अडथळे आले. रात्री वाहन दरीत कोसळल्यानं ८ जणांचा मृत्यू झाला. मृतामध्ये अधिकतर नेपाळी मजूर असल्याचं सांगण्यात आलं.

२०० मीटर खोल दरीत वाहन कोसळले-अपघाताची माहिती मिळाळ्यानंतर पोलीस आणि प्रशासनाचे पथक बचावपथकसह घटनास्थळी पोहोचले. रात्रीच्या वेळी असलेला अंधार आणि दुर्गम भाग असल्यानं मदतकार्य करताना अडचणी आल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार मोठ्या प्रयत्नानंतर वाहनातून मृतदेह बाहेर काढता आले. नैनीताल जिल्ह्यातील मल्लागाव येथील ग्रामीण भागात हा अपघात झाला. गावापासून काही दूर अंतरावर जाताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर वाहन २०० मीटर खोल दरीत कोसळले.

वाहन कोसळल्याचा आवाज आला अन्... रात्रीच्या वेळी दरीत वाहन कोसळल्यानंतर मोठा आवाज आला. हा आवाज ऐकताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना अपघात झाल्याची माहिती कळविली. वेताळघाटचे पोलीस अधिकारी अनीश अहमद आणि महसूल उपनिरीक्षक कपिल कुमार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं मदतकार्य सुरू केलं. २०० मीटर खोल दरीतून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्याकरिता २ तासांहून अधिक वेळ लागला.

ठेकेदाराकडं काम करायचे नेपाळी मजूर-पोलिसांच्या माहितीनुसार चालकासहेत ९ नेपाळी मजूर हे वाहनातून रामनगरच्या दिशेनं जात होते. हे नेपाळी मजूर रामनगरवरून मायदेशी जाणार होते. जखमी प्रवाशांना पुढील उपचाराकरिता वेताळघाट येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस अधिकारी अनीस अहमद यांनी अपघाताची चौकशी करणार असल्याचं सांगितलं. नेपाळमधील रहिवासी असलेले मजूर हे एका ठेकेदाराकडं काम करत होते.

हेही वाचा-

  1. म्हैस रस्त्यावर आल्यानंतर भरधाव वाहनानं अनेक वाहनांना उडवलं हवेत, पाहा व्हिडिओ - Nagpur Accident
  2. आमदाराच्या गाडीसमोर ट्रक झाला पलटी; आमदार संजय गायकवाड आले मदतीला धावून, पाहा व्हिडिओ - Truck Accident

ABOUT THE AUTHOR

...view details