महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण; शूटर शिवा कुमारसह ५ जणांना यूपीतून अटक - BABA SIDDIQUI MURDER CASE

पोलीस महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांच्या हत्येप्रकरणी आणखी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

BABA SIDDIQUI MURDER CASE
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील पाच आरोपींना अटक (Hindi desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2024, 10:56 PM IST

बहराइच : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशमधील बहराइचमधून आणखी पाच आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँच आणि यूपी एसटीएफचे संयुक्त पथकानं या गुन्ह्यातील लोकांचा शोध घेण्याची कारवाई केली.

याआधी तीन आरोपींना अटक : रविवारी टीमने कैसरगंजच्या गंडारा भागात राहणाऱ्या पाच लोकांना ताब्यात घेतलं. याआधीही गंडारा येथून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. रविवारी, यूपी एसटीएफचे उपनिरीक्षक आणि मुंबई गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील पवार आणि जितेंद्र भारती यांच्या नेतृत्वाखाली बहराइचला पोहोचलेले पथक बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींच्या शोधात नानपारा भागात पोहोचले होते.

अशी केली अटक : गंडारा येथील रहिवासी शिवकुमार उर्फ ​​शिवा, अनुराग, आकाश श्रीवास्तव, ज्ञानप्रकाश त्रिपाठी उर्फ ​​ओम आणि अखिलेंद्र प्रताप सिंग यांना पथकानं घेराव घालून हंडा बशरी परिसरातून अटक केली. नानपरा भागात संयुक्त पथक सकाळपासूनच तळ ठोकून होते. सर्व आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या बेतात असल्याची माहिती मिळताच संयुक्त पथकानं त्या सर्वांना अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पथक मुंबईकडं रवाना : सायंकाळी उशिरा नानपारा पोलीस ठाण्यात पकडलेल्या आरोपींना घेऊन हे पथक मुंबईकडं रवाना झाले. कारवाई करण्यात आलेल्या टीममध्ये एसटीएफचे हेड कॉन्स्टेबल मुनेंद्र सिंग, कॉन्स्टेबल अजित कुमार सिंग, ड्रायव्हर सुरेश सिंग आणि मुंबई क्राइम ब्रँचचे एपीआय अमोल माळी, अजय विराजदार, मारुती कदम, एसआय स्वप्नील काळे, धात्रे, कॉन्स्टेबल विकास चहान, महेश शवंत, अनिल पवार यांचा समावेश आहे.

हेही वाचा -

  1. बाबा सिद्दीकी हत्याकांड : मारेकरी मेसेजिंग अ‍ॅपद्वारे होते अनमोल बिश्नोईच्या थेट संपर्कात, मुंबई पोलिसांचे धक्कादायक खुलासे
  2. बाबा सिद्दीकींची हत्या करणारे फोनद्वारे बिश्नोई गँगच्या होते संपर्कात; आणखी पाच आरोपी अटकेत
  3. पुण्यात रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; तीन महिन्यांपासून सुरू होतं प्लॅनिंग

ABOUT THE AUTHOR

...view details