उन्नाव Unnao Road Accident : उत्तर प्रदेशातील उन्नावमधूम भीषण अपघाताची घटना समोर आलीय. (Unnao Accident News) उन्नावमध्ये बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झालाय. उन्नावमधील एका डबल डेकर बसनं दुधाच्या कंटेनरला धडक दिल्यानं भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आलीय.
बचाव कार्य सुरू : मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर झाला. एका डबल डेकर बसनं दुधाच्या कंटेनरला मागून धडक दिली. या अपघातात 18 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीनं मदत आणि बचाव कार्य सुरू केलंय. ही बस बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जात होती. बेहता मुजावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडा गावासमोर आग्रा एक्सप्रेस वेवर हा अपघात झाला.
अनेक प्रवाशांची प्रकृती गंभीर : अपघात होताच गावकऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचावकार्य सुरू केलंय. पोलिसांनी मृतदेहांची ओळख पटवण्यास सुरुवात केलीय. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलंय. अनेक प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचंही सांगण्यात येत आहे. आज पहाटे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
- मुख्यमंत्री योगी यांनी उन्नाव जिल्ह्यातील रस्ते अपघाताची दखल घेतली आहे. जखमी लवकर बरे व्हावेत, अशी पोस्ट मुख्यमंत्र्यांच्या एक्स हँडलवरून पोस्ट करण्यात आलीय. अधिकाऱ्यांना तातडीनं घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
खाजगी बसची ऑटोला जोरदार धडक : या आधीही अशीच एक घटना घडली होती. नागपुरात सैन्य जवानांच्या ऑटोला खासगी बसनं धडक दिल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनतेत दोन जवानांचा मृत्यू झाला होता. तर 6 जण गंभीर जखमी झाले होते. कामठी (जुनं) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान नदीच्या पुलावर रविवारी (16 जून) रोजी ही घटना घडली होती.
हेही वाचा-
- राजधानीनंतर आता उपराजधानीतही 'हिट अँड रन'च्या दोन घटना, दोघांचा मृत्यू - Hit and Run
- काळ आला होता, पण . . . रेल्वे ट्रॅकवर पाय घसरुन पडली महिला: दोन्ही पाय गमावले, थोडक्यात वाचला जीव - Mumbai Local Train Accident