शिमलाCongress MLA joined BJP :हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या सहा बंडखोर आमदारांसह तीन अपक्ष आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे आमदार सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो, इंदर दत्त लखनपाल तसंच अपक्ष आमदार केएल ठाकूर, होशियार सिंहसह आशिष शर्मा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्याचवेळी 6 बंडखोर आमदारांना सभापतींनी निलंबित केलं आहे. तसंच 3 अपक्ष आमदारांनी राजीनामे दिले आहेत.
6 बंडखोर आमदार अपात्र : राज्यसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या या 6 बंडखोर आमदारांना हिमाचल प्रदेशचे सभापती कुलदीप सिंह पठानिया यांनी अपात्र ठरवलं होतं. ते म्हणाले की, पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत 6 सन्माननीय आमदारांविरुद्धची तक्रार आमदार आणि मंत्री हर्षवर्धन यांच्यामार्फत आमच्या सचिवालयाला प्राप्त झाली होती, त्यानंतर त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत निर्णय दिला. निलंबित आमदारांनी व्हिपचं उल्लंघन केलं होतं.
काँग्रेसची संख्या 40 वरून 34 वर : हिमाचल प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे 40 आमदार होते. 68 सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेला जादूई आकडा 35 होता. 6 आमदारांच्या बंडखोरीनंतर, काँग्रेसची संख्या 40 वरून 34 वर आली आहे. जी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या जादूई आकड्यापेक्षा एक कमी आहे. मात्र, बंडखोर आमदारांना सदस्यत्वावरून अपात्र ठरवल्यानंतर आता विधानसभेचे संख्याबळ 62 झालं आहे. अशा स्थितीत बहुमतासाठी आवश्यक असलेला जादूई आकडा आता 32 झाला आहे. त्यामुळं विधानसभेत सध्या फक्त काँग्रेसच पुढं असल्याचं दिसून येत आहे.
काँग्रेसच्या 6 आमदारांनी केलं क्रॉस व्होट : हिमाचल प्रदेशात राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक झाली. ती जागा जिंकण्यासाठी 35 आमदारांच्या मतांची गरज होती. काँग्रेसचे 40 आमदार होते, त्यामुळं पक्षाचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. भाजपाकडं 25 आमदार असून त्यांची 10 मतं कमी होती, तरीही पक्षानं हर्ष महाजन यांना उमेदवारी दिली होती. निवडणूक झाली तेव्हा, काँग्रेसच्या 6 आमदारांनी क्रॉस व्होट केलं. तीन अपक्ष आमदारांनीही भाजपा उमेदवाराच्या समर्थनार्थ मतदान केलं. त्यामुळं भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना 34-34 मते मिळाली. अखेर चिठ्ठ्याद्वारे निर्णय झाला, त्यात भाजपाचे हर्ष महाजन विजयी झाले होते.
हे वाचलंत का :
- लोकसभा निवडणूक 2024 : 3000 शतकपार वयोवृद्ध मतदारांचा कौल कुणाला याची उत्सुकता... - Thane Lok Sabha Constituency
- "केजरीवाल जेलमध्ये गेले आणि संजय राऊत...", केजरीवालांचं उदाहरण देत किरीट सोमैयांचा राऊतांवर निशाणा - Kirit Somaiya News
- कल्याणचा सुभेदार कोण? मुख्यमंत्री शिंदे पुत्र की दिवंगत आनंद दिघेंचा पुतण्या? - Kedar Dighe VS Shrikant Shinde