मुलुगु (तेलंगणा) :तेलंगणाच्या मुलुगु जिल्ह्यात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत सात माओवादी ठार (Seven Maoists killed in Telangana) झाल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं रविवारी (1 डिसेंबर) माध्यमांशी संवाद साधताना दिली. पोलीस आणि माओवाद्यांमधील चकमकीची घटना रविवारी सकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास घडली. 10-12 माओवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला, अशी माहिती मुलुगुचे एसपी शबरिश यांनी दिली.
पोलिसांनी काय म्हटलंय? : रविवारी (1 डिसेंबर) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास चकमक सुरू झाली. मुलुगु जिल्ह्यातील एतुरनगरम मंडलच्या चालपाका भागातील जंगलात ही चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, मुलुग पोलिसांनी माओवादी चालपाका जंगलात दिसून आले. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. यावेळी माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं नाही. तर त्याऐवजी त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांकडूनही त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त :यासंदर्भात अधिक माहिती देत एसपी शबरिश म्हणाले की, "रविवारी पहाटे मुलुगु पोलीस गस्त घालत होते. सकाळी 6:15 वाजता, आमच्या टीमला ऑलिव्ह ग्रीन गणवेशातील 10 ते 12 व्यक्ती दिसल्या. त्यांनी आमच्या जवानांवर अचानक गोळीबार केला. वारंवार आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करूनही त्यांनी गोळीबार चालू ठेवला. त्यांनी पोलिसांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करण्यास प्रवृत्त केलं. गोळीबारानंतर आमच्या टीमनं सुमारे अर्धा तास शोध घेतल्यानंतर आम्हाला सात मृतदेह सापडले. त्यांच्याजवळ अनेक शस्त्रं सापडली." दरम्यान, या चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि स्फोटकं जप्त केली आहेत. या कारवाईसंदर्भात दक्षता घेत पोलीस विभागानं परिसरात शोधमोहीम सुरू ठेवली आहे.
- सप्टेंबरमध्ये तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत सहा माओवादी ठार झाले होते. सध्याच्या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये दोन एके-47 रायफल, एक एसएलआर, एक 303 रायफल, एक पिस्तूल, मॅगझिन, जिवंत राउंड, किट बॅगसह इतर शस्त्रांचा समावेश आहे.
हेही वाचा -
- सुकमात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; घटनास्थळावर 30 ते 40 नक्षलवादी असल्याचा दावा - Sukma Naxal Encounter
- किश्तवाड चकमक : भारतीय सुरक्षा दलाच्या दोन जवानांना वीरमरण, छतरू परिसरात जवानांची दहशतवाद्यांशी चकमक - Kishtwar Encounter Update
- जम्मूच्या डोडामध्ये चकमक; सैन्यदलातील कॅप्टनला वीरमरण, एका दहशतवाद्याचा खात्मा! - Encounter in Jammu Doda