ETV Bharat / bharat

फेंगल चक्रीवादळाचा तडाखा : केरळमधील चार जिल्ह्यांना रेड अलर्ट; मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, शाळांना सुटी - CYCLONE FENGAL LIVE UPDATE

फेंगल चक्रीवादळानं देशभरातील हवामानात बदल झाला आहे. केरळमधील चार जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला. सध्या केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.

Cyclone Fengal Live Update
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2024, 8:57 AM IST

तिरुअनंतपुरम : फेंगल चक्रीवादळामुळे केरळमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. केरळमधील तब्बल चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. सध्या राज्यभर मुसळधार पाऊस सुरू आहे. कोट्टायम, इडुक्की, वायनाड, पठाणमथिट्टा आणि कन्नूर जिल्ह्यातील अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र, नियोजित परीक्षांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं शिक्षण विभागाकडून कळवण्यात आलं आहे.

केरळमधील चार जिल्ह्यात रेड अलर्ट : फेंगल चक्रीवादळामुळे देशभरातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तिरुअनंतपुरम आणि कोल्लम वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार किंवा अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि वायनाड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला. तर इडुक्की, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड आणि कासारगोड जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला. भारतीय हवामान विभागानं IMD पथनामथिट्टा, अलप्पुझा आणि कोट्टायमसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

सावधगिरी बाळगण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि अचानक पूर येण्याची शक्यता आहे. शहरी आणि सखल भागात पाणी साचण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे, असं आवाहन त्यांनी केलं.

किनारपट्टी आणि डोंगराळ प्रदेशातील नागरिकांना आवाहन : मुसळधार पाऊस सुरू असल्यानं मुख्यमंत्री पुनराई विजयन यांनी भूस्खलन प्रवण परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी तयार राहण्याचा सल्ला दिला. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असलेल्या नागरिकांनी आश्रय छावण्यात जावं, असं आवाहन त्यांनी केलं. किनारपट्टीवरील नागरिकांना धोका जास्त असल्यानं रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा त्यांनी दिला. रेड आणि ऑरेंज अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांमध्ये आगाऊ मदत छावण्या उभारण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिल्या आहेत.

मदतीसाठी नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक : केरळमधील मुसळधार पावसानं सर्व जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. हे नियंत्रण कक्ष तालुका आणि जिल्हा स्तरावर 24/7 कार्यरत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत 1077 किंवा 1070 या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधून नागरिकांना तत्काळ मदत मिळू शकते.

हेही वाचा :

  1. फेंगल चक्रीवाद; तामिळनाडूच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागानं दिला 'हा' इशारा
  2. फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव कमी होणार? हवामान विभागानं नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.