नवी दिल्ली TCS World10K Bengaluru : टीसीएस वर्ल्ड 10k मॅरेथॉनचं आयोजन बंगळुरूत करण्यात आलं होतं. ही मॅरेथॉन फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ परेड ग्राऊंडपासून सुरू होऊन आर्मी पब्लिक स्कूलमध्ये संपली. या स्पर्धेत 28000 हून अधिक खेळाडू सहभागी झाले. दरम्यान, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) वर्ल्ड 10K बंगळुरूच्या 16 व्या आवृत्तीला रविवारी सकाळी देशभरातून आणि जगभरातील धावपटूंनी नवीन मार्गांची चाचणी घेऊन सुरुवात केली.
जिंकली 'इतकी' रक्कम : मॅरेथॉनमध्ये उलसूर तलाव हे सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं. नेहमीप्रमाणे या मैदानात देश-विदेशातील दिग्गज धावपटूंचा समावेश होता. केनियानं, या मॅरेथॉनसाठी अत्यंत मजबूत असा पुरुष आणि महिला संघ मैदानात उतरवला. तर या मॅरेथॉनमध्ये किरण मात्रेनं 00:29:32 च्या वेळेसह भारतीय एलीट पुरुष गट जिंकला. संजीवनी जाधवनं 00:34:03 वेळेसह भारतीय एलीट महिला गट जिंकला. दोन्ही भारतीय धावपटूंनी 2,75,000 रुपयांची रक्कम जिंकली. तर पीटर म्वानिकी आणि लिलियन कासाईट यांनी या स्पर्धेत एलीट पुरुष आणि एलीट महिला गटात विजय मिळवला. या दोघांनीही 26,000 डॉलर एवढी बक्षीसाची रक्कम जिंकली.