हैदराबाद Suicide On Facebook Live:फेसबुककडं आपण कधीही मनोरंजनाचं साधन म्हणून बघतो. परंतु याच फेसबुकमुळे कुणाचा जीव वाचू शकतो हे आपल्याला माहिती आहे काय? होय अशीच एक घटना मेरठ येथे घडली आहे. पत्नी रागाच्या भरात माहेरी निघून गेल्यामुळे एका प्राध्यापकानं चक्क फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र अमेरिकेतून युपी पोलिसांना फोन आला. त्यात प्राध्यापक आत्महत्येच्या तयारीत असल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्राध्यपाकाला शोधून काढलं आणि प्राध्यापकाचा जीव वाचला.
हे प्रकरण मेरठ शहरातील सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक लाईव्ह करत असणारी व्यक्ती शहरातील एका पदवी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. पत्नीशी काही मतभेद झाल्यामुळे पत्नी रागाच्या भरात माहेरी निघून गेली. प्राध्यापकानं पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अपयशी झाला. त्यानंतर प्राध्यापकानं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. रागाच्या भरात मेरठ रेल्वे स्थानकाच्या दिशेनं निघाला.
कॅलिफोर्नियातील मेटा मुख्यालयातून फोन: प्राध्यापकानं फेसबुक लाईव्हमध्ये रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं. योगायोगानं हा व्हिडिओ अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील फेसबुकच्या मूळ मेटा मुख्यालयात दिसला. यानंतर तेथून उत्तर प्रदेश पोलीस मुख्यालयाला अलर्ट पाठवण्यात आला.
पोलिसांनी अशाप्रकारे वाचवला प्राध्यापकाचं जीव: माहिती मिळताचं वरिष्ठ पोलीस अधिकारी शशांक द्विवेदी यांनी फेसबुकवर लाईव्ह आलेल्या प्राध्यापकांची माहिती काढली. ते सिव्हिल लाइन्स परिसरात राहात असल्याचं समजलं. त्यानंतर प्राध्यापकाच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. तसंच नगर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी एक टीम पाठवली. जीआरपीचे जवान तेथे पोहोचले. मात्र, तेथे प्राध्यापक आढळून आले नाहीत. पोलिसांना मोबाईल क्रमांकाच्या आधारे लाईव्ह लोकेशन सापडलं असता ते परतापूरचं असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर परतापूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी प्राध्यापक महाशयांना काही वेळ कॉलवर बोलण्यात गुंतवून ठेवलं. तेवढ्यात जीआरपी टीम त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांचा जीव वाचला.
जीआरपीचे निरीक्षक विनोद यांनी सांगितलं की, मेरठ पोलीस आणि जीआरपीला पोलीस हेड क्वार्टर लखनऊकडून माहिती मिळाली होती. अलर्ट मिळाल्यानंतर 7 मिनिटांत सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन आणि स्टेशन प्रभारी जीआरपीने थेट लोकेशन ट्रेस केलं आणि प्राध्यापकापर्यंत पोहोचले.
पोलिसांनी प्राध्यापकाची समजूत काढली:शहर पोलीस अधीक्षक आयुष विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीआरपी आणि प्रादेशिक पोलिसांच्या मदतीनं या प्राध्यापकांना आत्महत्येपासून वाचवण्यात आलं. पोलिसांनी प्राध्यापकाची समजूत काढली. पत्नीसोबत झालेल्या वादातून प्राध्यापकानं हे पाऊल उचलल्याची माहिती मिळाली.
हेही वाचा
- धक्कादायक! लाडक्या कुत्र्याला आईनं मारलं म्हणून बालकानं केली आत्महत्या - Chhatrapati Sambhajinagar Crime
- खळबळजनक! शिक्षकाचं विद्यार्थिनीवर प्रेम जडलं, तिने थेट आयुष्यच संपवलं - Girl Student Suicide Case