कौशांबी (उत्तर प्रदेश) : प्रयागराज एसटीएफ आणि महाराष्ट्र पोलिसांनी हत्येतील फरार आरोपीला अटक केली आहे. आरोपी शशांक मिश्रा उर्फ सोनू हा ठाण्यातील महालक्ष्मी ज्वेलर्सच्या मालकाला लुटण्याच्या उद्देशाने सेल्समनचा खून करून फरार झाला होता. त्याचवेळी हत्येतील त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
एसटीएफचे उपअधीक्षक शैलेश प्रताप सिंह यांनी सांगितलं की, महालक्ष्मी ज्वेलर्स गोळीबार प्रकरण; शहापूर बंदची हाक देत पोलीस ठाण्यावर व्यापाऱ्यांचा मूक मोर्चा, हा मांझनपूरचा रहिवासी आहे. त्यानं कौशांबी जिल्ह्यातील त्याच्या इतर साथीदारांसह शाहपूर, ठाणे, येथे असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्सचे सेल्समन दिनेश चौधरी यांना लुटले. 21 डिसेंबर रोजी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर सोनू व्यतिरिक्त अंकित यादव उर्फ शिंटू रा. महामदपूर आणि फैजान, राहणार सिरियाकला हे तिघेही पळून गेले.
आरोपीची ओळख पटल्यानंतर ठाणे पोलिसांनी एसटीएफच्या पथकासह गुरुवारी दुपारी ४ वाजता मांढनपूर येथे छापा टाकून सोनूला अटक केली. या हत्येतील आरोपी अंकित यादव आणि फैजान अजूनही फरार आहेत. सोनूने चौकशीदरम्यान सांगितलं की, फैजानने दरोड्याची योजना आखली होती आणि जानेवारी 2024 पासून ज्वेलरी व्यावसायिकाचा शोध सुरू होता. आरोपी सोनूवर मांझनपूर पोलिस ठाण्यात यापूर्वी अर्धा डझनवर गुन्हे दाखल आहेत.