महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

माध्यमसम्राट रामोजी राव यांच्या पुतळ्याचं होणार अनावरण; भावी पिढ्यांना मिळणार प्रेरणा - Ramoji Rao statue unveiled

Ramoji Rao Statue Unveiled : माध्यमसम्राट रामोजी राव यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ 7.5 फूट उंच पुतळ्याचं लवकरच विशाखापट्टणममध्ये अनावरण करण्यात येणार आहे. श्रीकाकुलम जिल्ह्यातील साई डिग्री कॉलेज कॅम्पसमध्ये देखील त्यांचा आणखी एक पुतळा बसवण्यात येणार आहे.

statue of media mogul Ramoji Rao
रामोजी राव यांचा पुतळा बनवताना शिल्पकार राजकुमार वुडायर (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 15, 2024, 6:56 PM IST

हैदराबाद Ramoji Rao Statue Unveiled : रामोजी ग्रुपचे प्रमुख रामोजी राव यांचा साडेसात फुटी पुतळा आंध्र प्रदेशमधील कोनसीमा जिल्ह्यातील कोठापेट येथे प्रसिद्ध शिल्पकार राजकुमार वुडायर यांनी तयार केला आहे. सध्या पुतळ्याला अंतिम रुप देण्यात येत आहे. विजयनगरमचे खासदार कालिशेट्टी अप्पलानायडू यांनी मूर्तिकार राजकुमार वुडायर यांना पुतळा बनवण्यास सांगितलं होतं. अनेक चित्रे पाहिल्यानंतर रामोजी राव यांचा 60 व्या वर्षीचा फोटो पुतळा बनवल्यासाठी निवडल्याचं वुडायर यांनी म्हटलं आहे.

रामोजी राव यांचा पुतळा बनवताना शिल्पकार राजकुमार वुडायर (ETV BHARAT Reporter)

रामोजी राव यांच्यापासून भावी पिढ्यांना प्रेरणा : खासदार अप्पलानायडू यांनी शुक्रवारी रात्री पुतळ्याची पाहणी करत त्यात काही बदल सुचवले आहेत. यावेळी बोलताना खासदार अप्पलानायुडू म्हणाले की, "'ईनाडू'चं जन्मस्थान असलेल्या विशाखापट्टणममध्ये या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. दुसरा पुतळा श्रीकाकुलम जिल्ह्यातील रणस्थलम येथील साई पदवी महाविद्यालयाच्या आवारात बसवला जाईल. रामोजी राव यांचा पुतळा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. तेलुगु लोकांच्या सेवेचे प्रतीक म्हणून रामोजी राव यांचा पुतळा उभारण्यात येत आहे."

8 जून रोजी निधन :आजारपणामुळं पद्म विभूषण रामोजी राव यांचं 8 जून रोजी हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं होतं. त्यानंतर त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी रामोजी फिल्मसिटीतील कॉर्पोरेट कार्यालयाच्या इमारतीत ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी तसंच समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं होतं. रामोजी राव यांनी पत्रकारिता, चित्रपट, मनोरंजन, शिक्षण आदी उद्योगात मोठी भरारी घेतली. त्यांच्या निधनानं पत्रकारितेचं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. तसंच राहुल गांधी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, चंद्रबाबू नायडू यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.

'हे' वाचलंत का :

  1. रामोजी रावांच्या निधनानं झालेली पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही- मुख्यमंत्री रेवंत रेड्डी - RAMOJI RAO NEWS
  2. 'रामोजी ग्रुपचं विजयपथावरील मार्गक्रमण निरंतर सुरूच राहील': इच्छापत्रातून कर्मचाऱ्यांना रामोजी राव यांची भावनिक साद, सोपवली जबाबदारी - Ramoji Rao letter
  3. अभिनेता विजय सेतुपतीनं रामोजी राव यांना वाहिली श्रद्धांजली - Vijay Sethupathi on Ramoji Rao Demise

ABOUT THE AUTHOR

...view details