महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रेव्ह पार्टीत सापाचं विष वापरल्या प्रकरणी एल्विष यादवच्या अडचणीत वाढ, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात महत्त्वाची माहिती समोर

Snake Poison In Rave Party : 'बिग बॉस OTT 2' चा विजेता तसंच यूट्यूबर एल्विश यादवच्या फार्म हाऊसवरील रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं एल्विश यादवच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Snake Poison In Rave Party
Snake Poison In Rave Party

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 10:06 PM IST

जयपूरSnake Poison In Rave Party :नोएडा येथील सोशल मीडिया इन्फ्लुएसर एल्विश यादव यांच्या फार्म हाऊसमधील रेव्ह पार्टीमध्ये सापाचं विष वापरण्यात आल्याची पुष्टी झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात जयपूरच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबनं (एफएसएल) नोएडा पोलिसांना मदत केली आहे. नोएडा पोलिसांनी एल्विश यादवच्या फार्म हाऊसमधून नमुने गोळा करून चाचणीसाठी अनेक पाठवले होते. जयपूर एफएसएलकडं नमुने पाठवल्यानंतर नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा नमुन्यात रेव्ह पार्टीत सापाचं विष वापरल्याचं स्पष्ट झालं आहे.

क्रेट प्रजातीच्या सापांचं विष :फॉरेन्सिक सायन्स लॅब, जयपूरचे संचालक डॉ. अजय शर्मा म्हणाले, की "नोएडा पोलिसांनी 8 नोव्हेंबर 2023 रोजी विशेष विनंतीवरून नमुने तपासणीसाठी पाठवले होते. ज्याची तपासणी केल्यानंतर आम्ही 29 नोव्हेंबर रोजी अहवाल तयार केला होता. आमच्या तपासणीत या नमुन्यांमध्ये करैत जातीच्या सापांचं विष असल्याची पुष्टी झाली आहे. हा अहवाल अनेक दिवस आमच्याकडं होता. त्यानंतर आम्ही हा अहवाल नोएडा पोलिसांकडं पाठवला आहे."

पाच जणांना अटक, 9 साप सापडले :बिग बॉस OTT-2चा विजेता एल्विश यादव यांच्यासह अनेक लोकांविरुद्ध नोएडामध्ये गुन्हा दाखल होता. त्यानंतर पीपल्स फॉर ॲनिमल्स या संस्थेनं एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. छाप्यादरम्यान 9 सापही जप्त पोलिसांनी केलं होतं. चौकशीदरम्यान रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याचंही समोर आले. मात्र एल्विश यादवनं विषाचा वापर केला नसल्याचा दावा केला होता.

ऑडिओ समोर आला : एल्विशनं या संपूर्ण प्रकरणात स्वत:ला निर्दोष घोषित केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. प्रसिद्ध झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एल्विशनं नाव समोर आले आहे. ऑडिओमध्ये, अटक करण्यात आलेल्या आरोपी राहुल यादवनं पीएफए ​​(मेनका गांधींची संघटना पीपल फॉर ॲनिमल्स) च्या सदस्याला सांगितलं. त्यानं एल्विसच्या पार्टीला ड्रग्स पोहोचवलं होतं.

हे वाचलंत का :

  1. एका व्यक्तीच्या कानशिलात लगावली, पण एल्विश यादवला ना खंत ना खेद!
  2. Elvish yadav : रेव्ह पार्टी आणि सापाचं विष पुरविल्या प्रकरणी एल्विश यादवची होणार पुन्हा चौकशी
  3. Elvish Yadav rave party case : रेव्ह पार्टी प्रकरणी एल्विश यादवचा जबाब नोंद, गारुड्यांसमोर होणार चौकशी

ABOUT THE AUTHOR

...view details