महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिजापूरमध्ये मोठी कारवाई! सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार - Six Naxalites Killed Encounter

Six Naxalites Killed Encounter : बिजापूरमध्ये पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी 6 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 3:34 PM IST

माहिती देताना अधिकारी

बिजापूर :Six Naxalites Killed Encounter : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी मोठी कारवाई केल्याची घटना समोर आली आहे. येथील चिकुरबत्ती-पुसबाकाजवळील जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका महिला केडरसह सहा नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. या कारवाईत डीआरजी, सीआरपीएफ 229 आणि कोब्राच्या पथकांचा सहभाग होता.

उपमुख्यमंत्री छत्तीसगड

सहा नक्षलवाद्यांना ठार केलं : सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर होते. त्या दरम्यान, बासागुडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चिकुरबत्ती आणि पुसबाका गावांच्या जंगलात अचानक मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू झाला. त्यानंतर सुरक्षा जवानांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात (Six Naxalites Killed) सहा नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं, असं पोलीस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी. यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.

एका महिलेसह सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले : जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि त्याची विशेष बटालियन कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट अ‍ॅक्शन) यांच्याशी संबंधित सुरक्षा जवान या कारवाईत सहभागी झाले होते, असंही ते म्हणाले. ही चकमक थांबल्यानंतर घटनास्थळावर एका महिलेसह सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. (Naxalites Killed ) या भागात अद्याप शोधमोहीम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सुरक्षा दलाच्या अनेक तुकड्या या भागात तैनात करण्यात आल्या : बिजापूर जिल्ह्यातील बस्तर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. त्यापूर्वी सुरक्षा दलांनी नक्षल्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. तसंच, निवडणुका जाहीर झाल्यानंतर या परिसरात आता अशा घटना वारंवार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा दलाच्या अनेक तुकड्या या भागात तैनात करण्यात आल्याचंही येथील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details