चंदीगड Late Punjabi Singer Sidhu Moose wala : दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हे पंजाबी संगीत क्षेत्रातील एक मोठं नाव होतं. मूसेवाला यांनी अल्पावधीतच आपल्या गायनानं लाखो चाहते बनवले होते. त्याच वेळी मूसेवाला यांची लोकप्रियता त्यांच्या मृत्यूचं कारण बनली. मूसेवालाची गाणी देशातच नाही तर परदेशातही ऐकली जातात. मात्र या गायकाची निर्घृण हत्या करण्यात आली. मूसेवाला यांच्यावर त्यांच्या जीपमध्ये हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. आता या गायकाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. गायकाच्या आई-वडिलांचं आयुष्य पुन्हा एकदा आनंदानं भरुन जाणार आहे. मूसेवाला यांच्या घरी लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे.
मूसेवाला यांचा पुनर्जन्म ? :दिवंगत मूसेवालाची 58 वर्षीय आई चरण कौर गरोदर आहे. गायकाची आई आयव्हीएफ गर्भधारणा तंत्राद्वारे गरोदर झालीय आणि पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये त्या त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहेत. ही बातमी ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. तर गायकाच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. मूसेवाला पुनर्जन्म घेणार असल्याचा विश्वास चाहत्यांना आहे. तथापि, दिवंगत गायकाच्या पालकांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.