नवी दिल्ली SC Rejects Plea Replacement Of EVM : लोकसभेच्या निवडणुका शनिवारी (16 मार्च) जाहीर होणार आहेत. मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएमवर (EVM) अनेकवेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. त्याविरोधात अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. ईव्हीएमविरोधात नुकतीच एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळं आता आगामी लोकसभा निवडणूक 'ईव्हीएम' वरच होणार हे स्पष्ट झालंय.
आम्ही किती याचिकांवर विचार करावा? : सुनावणीवेळी न्यायमूर्ती संजीव खन्ना, दीपंकर दत्ता आणि ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं सांगितलं की, न्यायालयानं यापूर्वीच ईव्हीएमच्या कार्यप्रणालीशी संबंधित अनेक याचिका हाताळल्या आहेत. आम्ही किती याचिकांवर विचार करावा? अलीकडेच, आम्ही VVPAT शी संबंधित याचिका हाताळली आहे." तसंच कलम 32 अंतर्गत याचा विचार करू शकत नाही, असंही खंडपीठानं यावेळी स्पष्ट केलं.