विजापूरRoad theft at Basaguda :चोरीच्या अनेक घटना तुम्ही वर्तमानपत्रातून वाचल्या असतील. मात्र, तुम्ही कधी रस्ताच चोरीला गेल्याची घटना कुठं वाचली का नाही ना? मात्र, असाच एक प्रकार विजापूरच्या बासागुडा इथं घडला आहे. बासागुड्यात चक्क संपूर्ण रस्ता चोरीला गेला आहे. चोरट्यांनी अतिशय हुशारीनं 2000 मीटर लांबीचा रस्ता गायब केला आहे. त्यामुळं चोरीला गेलेला रस्त्याची तक्रार देण्यासाठी गावातील लोक पोलिसांत पोहोचले आहेत. मात्र, तक्रार कशाच्या आधारावर दाखल करून घ्याची असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
बासागुड्यात PMGSY रस्ता चोरीला : बसगुड्यात खेड्यांचा विकास करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 2000 मीटर लांबीचा रस्ता बांधण्यात येणार होता. सन 2018 मध्ये शासनाकडून रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली होती. त्यामुळं रस्त्याचं काम सुरू होईल अशी गावकऱ्याना अपेक्षा असताना रस्ताच चोरीला गेलाय. या रस्त्याचं काम 2022 मध्ये पूर्ण होईल, असा फलक कामाच्या ठिकाणी लावण्यात आला होता. मात्र, आतापर्यंत रस्त्याचं काम सुरू न झाल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यामुळं गावातील लोकांनी आता रस्त्याबाबत आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. भाजपा नेतेही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत आहेत. या प्रकणात भाजपानं सहा सदस्यांची टीमही तयार केली असून घटनास्थळी जाऊन ते पाहणी करणार आहेत.
उटकेल गावापासून पटेल पारापर्यंत रस्ता बांधकामाचा फलक लावण्यात आला आहे. रस्त्याची पाहणी केली असता रस्त्याच काम केलेलं दिसत नाहीय. ग्रामस्थ, सरपंचानं देखील रस्त्याचं कामही झालं नसल्याचं सांगितलंत. त्यामुळं आम्ही रस्ता चोरीला गेल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडं केली आहे.- इशू सोनी, तक्रारदार