महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुंडन संस्काराला जाताना चालकाला लागली 'डुलकी'; ट्रक आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात, 6 ठार - Road Accident In Patna - ROAD ACCIDENT IN PATNA

Road Accident In Patna : मुंडन संस्काराला जाताना चालकाला डुलकी लागल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जण ठार झाले असून 5 जण गभीर जखमी झाले आहेत.

Road Accident In Patna
चक्काचूर झालेली कार (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 12:53 PM IST

पाटणा Road Accident In Patna :ट्रक आणि स्कॉर्पिओ कारच्या भीषण अपघातात तब्बल 6 प्रवाशांचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना बख्तियारपूर बिहारशरीफ चार महामार्गावर पहाटे 3 वाजताच्या सुमारास घडली. चालकाला डुलकी लागल्यानं हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनं चक्काचूर झाली. अपघातात ठार झालेले प्रवाशी हे नवादा जिल्ह्यातील नरहाट इथले रहिवाशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे प्रवाशी मंडन संस्कारासाठी जात असताना त्यांच्यावर काळानं घाला घातला.

मुंडन संस्कार करण्यासाठी जात होतं कुटुंब :नरहाट इथलं कुटुंब मुंडन संस्काराला जात होतं. यावेळी भरधाव ट्रकची आणि स्कॉर्पिओची भीषण धडक झाली. या अपघातात तब्बल 6 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर सहा प्रवाशी गंभीर जखमी आहेत. हमीदपूर बारा गावच्या मुकेश कुमार यांचे हिरालाल या पुत्राचा उमानाथ इथं मुंडन संस्कार होता. यावेळी हे कुटुंब स्कॉर्पिओनं जात होतं. मात्र ही भीषण घटना घडल्यानं या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला.

चालकाला डुलकी लागल्यानं झाली धडक :मुंडन संस्काराला जाताना कुटुंबावर काळानं घाला घातला असून या भीषण अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला. हमीदपूर इथले मुकेश कुमार आणि त्यांच्या कुटुंबातील 6 जण या अपघाघात ठार झाले. स्कॉर्पिओच्या चालकाला डुलकी लागल्यानं ट्रक आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपघातात गंभीर झखमी झालेल्या नागरिकांना तत्काळ पीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

स्कॉर्पिओमध्ये होते 11 जण :अपघाताची घटना घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अपघातग्रस्तांच्या विदारक आक्रोशानं परिसरात शोककळा पसरली. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती देऊन जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन बारह उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या स्कॉर्पिओमध्ये 11 प्रवाशी होते. त्यातील 6 प्रवाशी मृत झाले असून पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती बख्तियारपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी देवानंद कुमार यांनी दिली.

मृतांमध्ये 'या' नागरिकांचा आहे समावेश :मृतांमध्ये रिशु कुमारी (5), नीरज कुमार(25), पार्वती देवी (50), भगतिनी (60) और निर्मला देवी (50) यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. हे सगळे हमीदपूर बारा येथील रहिवासी आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तर जखमीमध्ये कमला देवी (45) हिसुआ, ( कहरिया बेलदरी ) तर इंदु देवी, नीतू कुमारी, कौशल कुमार, किटू कुमार (4 वर्ष), मीना देवी और रीता देवी यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

  1. ट्रॅक्टरला धडक दिल्यानंतर बस दरीत कोसळली, पंढरपूरला जाणाऱ्या 5 भाविकांचा मृत्यू - Mumbai Highway Accident News
  2. धबधबा पाहण्याकरिता थांबल्यानंतर 7 वाहनांना कंटेनरची धडक, अपघातानंतर नाशिकमध्ये पर्यटकांकरिता नवीन नियम - Accident In Kasara Ghat
  3. वरळी हिट अँड रन प्रकरण: अपघातग्रस्त वाहनावर याआधी झाली होती दंडात्मक कारवाई - Worli Hit And Run Case

ABOUT THE AUTHOR

...view details