महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कानपूरमध्ये अल्पवयीन मुलानं कारसोबत स्टंटबाजी करताना दोघींना उडवलं; थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद! - Kanpur News - KANPUR NEWS

Road Accident In Kanpur : दक्षिण कानपूरच्या किदवई नगरमध्ये एका वेगवान कारनं समोर असलेल्या स्कूटरला जोरदार धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झालीय. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलं कारसोबत स्टंटबाजी करत असताना ही घटना घडली.

Road Accident In Kanpur minor students hit mother and daughter in Kanpur Uttar Pradesh
कानपूर अपघात (CCTV FOOTAGE)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 7:55 PM IST

कानपूर Road Accident In Kanpur : दक्षिण कानपूरमधील किदवई नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साकेतनगर भागात भीषण अपघात झाला. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून व्हिडिओमध्ये काही अल्पवयीन मुलं कारसोबत स्टंट करत असल्याचं स्पष्ट दिसतंय. तसंच याचवेळी स्कूटरवरून एक महिला आणि मुलगी जात असताना कारनं त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

कानपूर अपघात (ETV Bharat)

नेमकं काय घडलं : मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या शुक्रवारी भावना मिश्रा या आपल्या मुलीसोबत साकेतनगर येथील आपल्या घरी परतत असताना वाटेत भरधाव वेगात समोरून येणाऱ्या कारनं त्यांच्या स्कूटरला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की भावना आणि त्याची मुलगी दूरवर फेकल्या गेल्या. यानंतर तिथं उपस्थित असलेल्यांनी दोघींना खासगी रुग्णालयात नेलं. मात्र, यावेळी डॉक्टरांनी भावनाला मृत घोषित केलं.

या अपघातासंदर्भात प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी कार पाहिली तेव्हा त्यात दोन अल्पवयीन मुलं आणि दोन मुली होत्या. हे सर्वजण शाळा बुडवून कारमध्ये फिरायला गेले होते. तसंच भरधाव वेगात गाडी चालवत स्टंटबाजी करत होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि कार चालवणाऱ्या मुलाला इतरांसह ताब्यात घेतलं.

या प्रकरणी अधिक माहिती देत किदवई नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी बहादुर सिंह यांनी सांगितलं की, आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आलंय. मुलगा अल्पवयीन असून त्याच्याकडं ड्रायव्हिंग लायसन्स नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. यासोबतच इतर आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

हेही वाचा -

  1. 'सुपरमॅन' बनायला गेला अन् कारागृहात पोहोचला! ट्रेनमध्ये सीट न मिळाल्यानं पठ्ठ्यानं छतावर झोपून केला 400 किमी प्रवास - Humsafar Express
  2. जळगावमध्ये भरधाव कारनं 5 महिला 2 चिमुकल्यांना उडवलं, एक ठार; जमावाकडून कार चालकाला बेदम मारहाण - Jalgaon Accident
  3. भरधाव कार आणि ट्रकची जोरदार धडक; एकाच कुटुंबातील सहा जण ठार - Road Accident In Bikaner

ABOUT THE AUTHOR

...view details