महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंध्रप्रदेशच्या इस्टर्न घाटात दुर्मिळ प्रजातीचे आढळले बेडूक; संशोधकांनी केला 'हा' दावा - Rare Sri Lankan Frog Species - RARE SRI LANKAN FROG SPECIES

Rare Sri Lankan Frog Species : आंध्रप्रदेशातील पूर्व घाटात दोन दुर्मीळ बेडकांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. हे दोन्ही बेडकं श्रीलंकेत आढळून येतात, असा दावा संशोधकांनी केला आहे. मात्र त्यांचं अस्तित्व पहिल्यांदाच भारतात दिसून आलं, असा दावाही या संशोधकांनी केला.

Rare Sri Lankan Frog Species
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 29, 2024, 2:38 PM IST

हैदराबाद Rare Sri Lankan Frog Species :पृथ्वी ही अनेक जीवांची जन्मभूमी असून जैव विविधतेला त्यात विशेष महत्व आहे. मात्र तरीही पृथ्वीवरील अनेक दुर्मिळ प्रजाती आपल्याला अज्ञात आहेत. या गोष्टी शोधण्यासाठी शास्त्रज्ञ सतत संशोधन करतात. त्यातून अनेक गोष्टींचा शोध लागतो. संशोधकांनी आंध्रप्रदेशच्या इस्टर्न घाटात दुर्मिळ प्रजातीचे दोन बेडूक शोधले आहेत. राणा ग्रेसिलिस गोल्डन बॅक्ड फ्रॉग आणि श्रीलंकन ​​ब्राऊन इअर फ्रॉग याला स्यूडोफिलॉटस रेजिअस म्हणूनही ओळखलं जाते. हे दोन बेडूक जगात फक्त श्रीलंकेतच आढळतात. मात्र त्यांचं अस्तित्व पहिल्यांदाच भारतात दिसून आलं आहे. ते कसे ओळखले जातात? जैवविविधतेच्या दृष्टीने भारत आणि श्रीलंका यांच्यात काय संबंध आहे? ते जाणून घेऊया या कास लेखातून.

बेडकाच्या दोन दुर्मिळ प्रजातीचा शोध : मानवी जगण्याचं सूचक इकोसिस्टममध्ये आहे. जर इकोसिस्टीम चांगली असेल तर निसर्ग चांगला राहील. नाहीतर जैव विविधता नष्ट होईल. पृथ्वीवरील इकोसिस्टीमला सजीवांच्या आधाराची गरज आहे. पृष्ठवंशी आणि उभयचर प्राणी यांचं त्यात विशेष महत्व आहे. जीवन जगण्यात त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. या पृथ्वीवर अनेक गोष्टी पर्यावरणीय बदलांमुळे नामशेष होत आहेत. काही क्वचितच दिसत असून असाच दुर्मिळ उभयचर प्राणी शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. पूर्व घाटातील उभयचरांवर अभ्यास आणि संशोधन मोठ्या प्रमाणावर चालू आहे. भारतात हवामान बदलाच्या संदर्भात जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षणावर विशेष लक्ष दिले जात असल्याचं दिसून येत आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या या संशोधनात असं दिसून आलं आहे, की या बेडकांनी प्लिस्टोसीन दरम्यान श्रीलंकेतून पूर्व घाटात स्थलांतर केलं. संशोधकांनी आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील शेषाचलम टेकड्यांमध्ये स्यूडोफिलॉटस रेगियस नावाच्या बेडकाची दुर्मिळ प्रजाती शोधून काढली. श्रीलंका गोल्डन बॅक बेडूक राणा ग्रेसिलिस हा गौनिथिम्मेपल्ली इथल्या पलामानेरू कौंडिन्या वनक्षेत्राजवळील तलावात सापडला. एपी जैवविविधता मंडळाच्या सदस्यांसह हैदराबाद प्राणीशास्त्र सर्वेक्षण ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांनी त्यांचा शोध लावला आहे.

हवामान बदलामुळे जगाची गळचेपी :जागतिक पातळीवर होत असलेल्या हवामान बदलामुळे जगाची गळचेपी होत आहे. चांगल्या पर्यावरणाचा आणि जैवविविधतेचा पूर्व घाट प्रसिद्ध आहे. पॉलीमॉर्फिक श्रीलंकन ​​ब्राऊन इअर बेडूक आणि श्रीलंकन ​​गोल्डन बॅक बेडूक या भागात आढळून आले आहेत. त्यांना हैदराबाद झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया -ZSI कार्यालयात आणण्यात आलं. या दोन्ही बेडकांच्या DNA चाचण्या करण्यात आल्या आहेत. पूर्व घाटातील श्रीलंकन ​​स्यूडोफिलॉटस रेगियसच्या ओळखीबद्दल आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या न्यूझीलंड जर्नल झूटाक्सामध्येही एक लेख प्रकाशित झालेला आहे. हिलिया आणि पश्चिम घाटात जैवविविधतेवर सर्वाधिक अभ्यास आणि संशोधन केलं जाते. पूर्व घाटात अशा बेडकांचा उदय होणं म्हणजे इथंही वातावरण चांगलं असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे. ही बेडकं केवळ प्रदूषित भागातच टिकतात, असा दावा शास्त्रज्ञांकडून करण्यात येतो.

प्लेस्टोसीन कालखंडाची आठवण :प्लेस्टोसीन काळात भारत आणि श्रीलंका यांचा संबंध आल्याचं संशोधकांचं मत आहे. या दरम्यान जमीन मार्ग आणि जंगल मार्ग होते. सध्या सापडलेला श्रीलंकन ​​बुश बेडूक 2005 मध्ये श्रीलंकेत सापडला होता. हा त्या देशातील जंगलात सगळीकडं आढळणारा बेडूक आहे. मात्र दोन दशकांनंतर तो भारतातील पूर्व घाटात तब्बल 700 किमी दूरच्या भागात आढळून आला आहे. ही घटना प्लेस्टोसीन कालखंडाची आठवण करुन देणारी असल्याचं म्हटलं जाते. श्रीलंकन ​​बुश बेडकाशी संबंधित तीन प्रजाती पश्चिम घाटात आढळून आल्या आहेत. तब्बल 220 वर्षांच्या काळानंतर श्रीलंकन ​​बुश बेडूक परत आढळून आला आहे. श्रीलंकेला स्यूडोफिलॉटस विविधतेच्या 75 प्रजातींसाठी ओळखलं जाते. तर पश्चिम घाटात 3 प्रजातींच्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र आता या प्रजाती पूर्व घाटात सापडल्या आहेत. पूर्व घाटातील जंगलात मोठ्या प्रमाणात पर्वत आहेत. या पर्वतांवर जैव विविधता आढळून येते. पूर्व घाटात भविष्यातही अधिक जैवविविधता मिळण्याची शक्यता आहे. यात दुर्मिळ बेडकांच्या प्रजाती आढळण्याची शक्यता असल्याचं मत भारतीय प्राणी वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या संशोधकांचं मत आहे.

सांडपाण्यातील सजीवांवर संशोधन :भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाचं मुख्यालय कोलकाता इथं असून प्रादेशिक कार्यालय हैदराबाद इथं आहे. हे केंद्र आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील गोड्या पाण्यातील, समुद्रातील पाणी आणि सांडपाण्यातील सजीवांवर संशोधन करते. या केंद्राच्या माध्यमातून राज्य सरकार संबंधित मंत्रालयं आणि संस्थांना सूक्ष्म जीवांपासून ते प्राण्यांपर्यंत संवर्धन उपायाची शिफारस करतात. हे संशोधक माकडं, साप, कासव, मासे, मांजर, मोर, उंदीर, बेडूक गोळा करतात. संग्रहालयात अनेक प्रजातींचं जतन करतात. संस्था प्रजातींचं संवर्धन, प्लॅस्टिकचं उच्चाटन आणि वायू आणि जल प्रदूषण कमी करण्याबाबत जागरूकता निर्माण करते. पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीनं सोन्याहून अधिक मौल्यवान असलेल्या नैसर्गिक संसाधनांचं संवर्धन करण्याची गरज असल्याचं संशोधकांचं मत आहे.

जगात बेडकांच्या सुमारे 7 हजार प्रजाती :जगात बेडकांच्या सुमारे 7 हजार प्रजाती आहेत. भारतातील बुरोइंग फ्रॉग, ग्रीन फ्रॉग, बुल फ्रॉग, पेंटेड फ्रॉग, एशियन कॉमन टॉड आणि नॅरो माउथेड फ्रॉग यासारख्या बेडकांच्या संवेदनशील प्रजाती आहेत. बदलत्या हवामानामुळे ते झपाट्यानं नाहीसे होत आहेत. देशात बेडकांच्या सुमारे 100 प्रजाती अनोळखी आहेत. यापैकी बऱ्याच प्रजाती त्यांच्या शोधापूर्वीच नष्ट झाल्या. भारतीय उपखंडात आतापर्यंत 19 प्रकारचे सोनेरी पाठीचे बेडक ओळखण्यात आले आहेत. हे बेडकं प्रामुख्यानं पाणथळ जमीन, शेतजमीन आणि गवताळ प्रदेशात आढळतात. नव्यानं सापडलेले हे बेडूक पूर्व घाटातही आढळतात. हे बेडूक फक्त तिथंच जगू शकतात, जिथे इकोसिस्टम चांगली आहे. अन्यथा ते देखील नामशेष होण्याची शक्यता असल्याचं मत संशोधकांनी व्यक्त केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details