हैदराबाद Raksha Bandhan 2024 :रक्षाबंधन (Rakhi Purnima 2024) हा बहीण आणि भावाच्या प्रेमाचा हा सण. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचं वचन देतो. संपूर्ण भारतात रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. रक्षाबंधन दिवशी भद्राकाळ असल्यानं राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त हा दुपारनंतर सुरू होतो.
कधी आहे भद्राकाळ (Bhadra Kaal):18 ऑगस्टला रात्री 2 वाजून 21 मिनिटांपासून ते 19 ऑगस्टला दुपारी 1 वाजून 24 मिनिटांपर्यंत 'भद्राकाळ' आहे.
राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त : 19 ऑगस्टला दुपारी 1 वाजून 26 मिनिटं ते सायंकाळी 6 वाजून 25 मिनिटांपर्यंत राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे.
भद्राकाळ संपल्यानंतर बांधा राखी : रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ असतो. या काळात राखी बांधनं वर्जित असतं. या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला 1 वाजून 24 मिनिटांपर्यंत भद्राकाळ आहे. त्यामुळं भद्राकाळ संपल्यानंतर रक्षाबंधनाचा मुहूर्त असेल. त्यामुळं बहिणींनी भद्राकाळ संपल्यानंतर भावाला राखी बांधावी.
काय आहे भद्राकाळ: पंचांगाची वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण अशी पाच अंगे आहेत. या अंगाचा पंचांगात कालगणनेसाठी विचार करण्यात येतो. त्याचबरोबर जयंती, सण, उत्सव, पुण्यतिथीचा बोध पंचागातून होतो. याच पाच अंगांशी करण आणि भद्राकाळशी संबंध आहे. करण अकरा असतात, त्यातील एक करण म्हणजे विष्टी करण. ज्या दिवशी 'विष्टी' करण असतो त्या दिवशी 'भद्राकाळ' असतो.