महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रशिया-युक्रेन युद्ध थांबवणाऱ्या मोदींना पेपर लीक का थांबवता आलं नाही; भाजपाचा शैक्षणिक संस्थांवर कब्जा - राहुल गांधी - Rahul Gandhi on NEET - RAHUL GANDHI ON NEET

Rahul Gandhi on NEET : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी UGC NEET, UG परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, "सर्व शैक्षणिक संस्था भाजपाच्या लोकांनी ताब्यात घेतल्या आहेत. जोपर्यंत त्यांची सुटका होत, नाही तोपर्यंत हे असंच चालू राहील."

Rahul Gandhi on NEET
राहुल गांधी (ETV BHARAT MH Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 20, 2024, 7:06 PM IST

नवी दिल्ली Rahul Gandhi on NEET :"NEET परीक्षेत अनियमितता आढळून आल्यावर परीक्षा रद्द करण्यात आली आहे. दुसरी रद्द होईल, की नाही माहीत नाही. पण याला कोणी ना कोणी जबाबदार आहे. NEET परीक्षेनंतर आता नेट परीक्षेतही हेराफेरी झाल्याची बातमी समोर आली आहे. परीक्षेच्या एका दिवसानंतर नेटची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

"नरेंद्र मोदींनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवलं, पण त्यांना पेपर लीक थांबवता आलं नाही. भाजपा सरकरानं शिक्षण व्यवस्था उद्धवस्त केलीय. न्याय्य, शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. हा मुद्दा आम्ही संसदेत मांडू. NEET, UGC NET चा पेपर लीक झाला आहे. नरेंद्र मोदींनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवल्याचं बोललं जात. मग नरेंद्र मोदी भारतात पेपर लीक का थांबवू इच्छित नाहीत"- राहुल गांधी

शिक्षण व्यवस्थेचं विमुद्रीकरण : "विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. व्यापम मध्य प्रदेशात झालं असून नरेंद्र मोदींचं सरकार व्यापम देशभर पसरवत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात आहे. पेपरफुटीचं कारण म्हणजे संपूर्ण कुलगुरू शिक्षण व्यवस्था भाजपासह त्यांच्या संघटनेच्या लोकांनी काबीज केल्या आहेत. या घटनेला जो कुणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

शिक्षण व्यवस्थेवर भाजपाचं नियंत्रण : NEET चा पेपर लीक झाल्यानंतर शिक्षण व्यवस्थेवर भाजपाचं नियंत्रण असल्याचं सिद्ध होत आहे. कष्टकरी विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे. दोषींवर कडक कारवाई करावी. देशातील तरुणांच्या भविष्याशी खेळलं जात आहे.

UGC-NET 2024 परीक्षा रद्द : देशभरात 18 जून रोजी होणारी UGC-NET 2024 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नेटचा पेपर रद्द झाल्यामुळं अनेकांच्या मनात निराशा आहे. कारण परीक्षा रद्द केल्यानं केवळ वेळेचा अपव्यय होत, नाही तर उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं जातं. त्यामुळं परीक्षेबाबत अधिक खबरदारी घ्याला हवी, असं राहुल गांधी म्हणाले.

11 लाखांहून अधिक उमेदवारांनी भरला NET फॉर्म : 11 लाखांहून अधिक उमेदवारांनी UGC NET फॉर्म भरला होता. परीक्षा 18 जून रोजी आयोजित करण्यात आली होती, परंतु नॅशनल सायबर क्राइम थ्रेट ॲनालिटिक्स डिव्हिजनला (NCTAU) परीक्षेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. शैक्षणिक संस्थांच्या ऑनलाइन चॅट फोरमवर यूजीसी नेटच्या प्रश्नपत्रिका सोडवल्याचं तपासात समोर आलं आहे. यानंतर नेट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

NEET परीक्षेतही हेराफेरी उघडकीस :अंडरग्रेजुएट मेडिकल एंट्रन्स एक्झाम म्हणजेच NEET UG 2024 परीक्षा 5 मे रोजी देशभरातील 40 हजारांहून अधिक परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. निकाल जाहीर होण्यापूर्वीच 1 जून रोजी NEET पेपर फुटीबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर NEET निकालात 67 विद्यार्थ्यांना टॉपर घोषित केल्यानंतर परीक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावर NTA नं उत्तरात सांगितलं की, 6 परीक्षा केंद्रांवर वेळेची नुकसानाची भरपाई म्हणून 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस गुण दिले होते. त्यामुळं विद्यार्थ्यांचे गुण वाढून 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले.

23 जून रोजी पुन्हा NEET परीक्षेची तयारी :या प्रकरणात केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, ग्रेस गुण रद्द करून, त्यांनी त्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय दिलाय. तसंच पुढील NEET परीक्षा 23 जून रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल 30 जून रोजी घोषित केला जाऊ शकतो.

'हे' वाचलंत का :

  1. गुजरातचे सोमेगोमे शिवसेनेला संपवू शकत नाही-संजय राऊत - Sanjay Raut Speech
  2. भाजपाविरोधात 21 जून रोजी काँग्रेसचे राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन; नाना पटोले यांची घोषणा - Nana Patole On BJP
  3. '...तर मी आतंकवादी आहे', वर्धापन सोहळ्यात उद्धव ठाकरे असं का म्हणाले? - Shivsena Foundation Day

ABOUT THE AUTHOR

...view details