महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

विधानसभा निवडणूक 2025; दिल्लीतील 'या' मतदार संघातून जिंकलेला आमदार होते मुख्यमंत्री; मात्र तिथंच राहुल गांधींची पदयात्रा रद्द - RAHUL GANDHI PADYATRA POSTPONED

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची नवी दिल्ली मतदार संघात पदयात्रा आयोजित करण्यात आली. मात्र अचानक ही पदयात्रा रद्द करण्यात आल्यानं उमेदवारांना धक्का बसला आहे.

RAHUL GANDHI PADYATRA POSTPONED
विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 20, 2025, 2:23 PM IST

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 ची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली. नवी दिल्ली विधानसभा मतदार संघ निवडणूक 2025 च्या प्रचारासाठी सोमवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र अचानक त्यांची रॅली पुढं ढकलण्यात आली. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित यांनी याबद्दल माहिती दिली आहे. "काही कारणांमुळे राहुल गांधी यांचा प्रचार दौरा रद्द करण्यात आला आहे. मात्र लवकरच राहुल गांधी यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पदयात्रा :नवी दिल्ली विधानसभा मतदार संघ ही जागा दिल्लीतील हाय प्रोफाइल जागांमध्ये गणला जाते. या मतदार संघातून आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि भाजपाचे प्रवेश वर्मा निवडणूक लढवत आहेत. नवी दिल्लीची जागा जिंकण्यासाठी भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी पूर्ण ताकद पणाला लावत आहे. सोमवारी राहुल गांधी यांची नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पदयात्रा काढण्यात येणार होती. मात्र शेवटच्या क्षणी त्यांची पदयात्रा पुढं ढकलण्यात आली. नवी दिल्ली मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित यांनी याबाबत माहिती दिली. "राहुल गांधी हे जनतेशी थेट जोडले जातात. त्यामुळे राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा काँग्रेसला मोठा फायदा होईल," असं त्यांनी यावेळी सांगितलं.

नवी दिल्ली मतदार संघावर सगळ्यांच्या नजरा : सर्व पक्षांच्या नजरा नवी दिल्ली मतदार संगावर आहेत. विधानसभा स्थापनेनंतर 1993 मध्ये नवी दिल्ली मतदार संघात पहिल्यांदाच निवडणूक झाली. त्यावेळी नवी दिल्ली परिसर गोल मार्केट विधानसभा मतदारसंघाचा भाग होता. 2008 मध्ये झालेल्या सीमांकनानंतर नवी दिल्ली विधानसभा जागा अस्तित्वात आली. नवी दिल्ली विधानसभा जागेवरून जिंकला, त्यानं दिल्लीत सरकार स्थापन केलं. 1998, 2003 आणि 2008 मध्ये शीला दीक्षित यांनी ही जागा जिंकली, तर 2013, 2015 आणि 2020 मध्ये अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. या दोघांनीही दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे.

हेही वाचा :

  1. मागासवर्गीय असल्यानं सोमनाथ सूर्यवंशीची पोलिसांनीच केली हत्या - राहुल गांधींचा आरोप
  2. राहुल गांधींचा परभणी दौरा म्हणजे "नौटंकी", चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
  3. परभणीत जाऊन राहुल गांधी यांनी विद्वेषाचं काम केलंय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details