चंदीगड Punjab Hooch Tragedy : विषारी दारू प्यायल्याने चार नागरिकांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना पंजाबमधील दिरबाजवळील गुजरान गावात आज सकाळी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे दिरबा हा अर्थमंत्री हरपाल चीमा यांचा मतदार संघ आहे. मात्र दिरबा इथं अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट झाल्याचं या घटनेवरुन दिसून येत आहे. या घटनेत भोला सिंग (50), निर्मल सिंग (42), प्रीत सिंग (42) आणि जगजीत सिंग (30) यांचा मृत्यू झाला आहे.
विषारी दारू पिल्यानं चार नागरिकांचा मृत्यू :दिरबाजवळील गुजरान गावात विषारी दारू प्यायल्याने चार नागरिकांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. गुजरान इथल्या भोला सिंग (50), निर्मल सिंग (42), प्रीत सिंग (42) आणि जगजीत सिंग (30) यांचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाला आहे. चौघांचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाल्यानंतर गावात शोककळा पसरली आहे. दिरबा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे.