नवी दिल्ली Puja Khedkar Moved Delhi High Court :वादग्रस्त परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आयएएस केडर केंद्रीय लोकसेवा आयोगानं रद्द केली आहे. आता पूजा खेडकर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या कारवाईला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सुप्रसिद्ध वकील इंदिरा जयसिंग या पूजा खेडकर यांची बाजू मांडत आहेत. या प्रकरणातील विशेष म्हणजे माझी उमेदवारी रद्द करण्याचा आदेश आजपर्यंत मला देण्यात आलेला नाही. माझ्याकडं फक्त प्रेस रिलीज आहे असं पूजा खेडकर यांच्या वतीनं इंदिरा जयसिंग यांनी न्यायालयात स्पष्ट केलं.
पूजा खेडकर यांनी दिलं उच्च न्यायालयात आव्हान :वादग्रस्त परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी केंद्रीय लोकसेवा आयोगानं रद्द ठरवली. त्यामुळे पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला. या प्रकरणी पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात लोकसेवा आयोगाच्या या निर्णयाला आव्हान दिलं आहे. सुप्रसिद्ध वकील इंदिरा जयसिंग यांनी पूजा खेडकर यांची आज दिल्ली उच्च न्यायालयात बाजू मांडली आहे. दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी पूजा खेडकर यांची बाजू मांडत कारवाईत प्रसिद्धीपत्रकाचा संदर्भ दिला आहे.
अद्यापही उमेदवारी रद्द केल्याचा आदेश दिला नाही :ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी आज उच्च न्यायालयात पूजा खेडकर यांची बाजू मांडताना प्राधिकरणाकडं जाण्याची परवानगी मागितली. त्या म्हणाल्या की, "या खटल्यात अद्यापही पूजा खेडकर यांना त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याचा आदेश देण्यात आलेला नाही. पूजा खेडकर यांच्याकडं फक्त प्रेस रिलिजचं आहे. प्रेस रिलिज रद्द करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्हाला प्राधिकरणाकडं जाण्याची परवानगी देण्यात यावी."
पूजा खेडकर यांचा नाही ठाकठिकाणा :पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC ) निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं. या प्रकरणी पूजा खेडकर यांची बाजू वकील इंदिरा जयसिंग यांनी मांडलीय. तर केंद्रीय लोकसेना आयोगाच्या वतीनं नरेश कौशिक यांनी बाजू मांडली. यावेळी बोलताना म्हणाले की, "पूजा खेडकर यांचा ठावठिकाणा माहीत नसल्यामुळे प्रेस रिलीज जारी करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द झाल्याची औपचारिक माहिती प्रेस रिलीज म्हणून देण्यात आली. पूजा खेडकर यांना उमेदवारी रद्द करण्याचा आदेश दोन दिवसांत दिला जाईल." यावेळी दिल्ली उच्च न्यायालयानं पूजा खेडकर यांना उमेदवारी रद्द करण्याला आव्हान देण्यासाठी योग्य मंचाकडं जाण्याला परवानगी दिली आहे.
हेही वाचा :
- कोणत्या पूजा खेडकर यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव?...पूजा खेडकर की पूजा दिलीपराव खेडकर ? विजय कुंभार यांचा सवाल - Pooja Khedkar Case
- पूजा खेडकर यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानं अटक होण्याची शक्यता, आणखी कोण अडचणीत येणार? - Pooja Khedkar bail rejected