हैदराबादPm Modi Reaction On Sam Pitroda :इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. एका मुलाखतीत पित्रोदा यांनी भारतातील विविध भागातील नागरिकांची तुलना तुलना परदेशी लोकांशी केलीय. “भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. भारतातील पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे दिसततात. तसंच पश्चिमेकडील नागरिक अरबी लोकांसारखे दिसतात. उत्तरेकडील लोक थोडेसे युरोपियन लोकांसारखे वाटतात. दक्षिणेकडील लोक आफ्रिकेसारखे दिसतात,” असं वक्तव्य सॅम पित्रोदा यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणातील वारंगल येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करत होते. “मला पित्रोदा यांच्या वक्तव्याचा आज खूप राग आला आहे. मला विरोधकांनी शिव्या दिल्या तरी मी सहन केलं. पण राहुल गांधींच्या शेहजाद्यांच्या वक्तव्यामुळं मला राग आलाय. हा माझ्या देशातील नागरिकांचा अपमान आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
हा देशाचा अपमान :सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस पक्ष दक्षिण भारतीयांना आफ्रिकन म्हणून संबोधत आहे. याचा अर्थ त्यांचा वर्णभेदाच्या धोरणावर विश्वास आहे. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवत असताना काँग्रेसनं त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता, हे आता आम्हाला समजलं आहे. त्यांच्या नेत्यानं भारतीयांचा अपमान का केला? याचं उत्तर काँग्रेसच्या राजपुत्राला द्यावं लागेल. हा संपूर्ण देशाचा अपमान आहे, तो आम्ही कोणत्याही प्रकारे सहन करणार नाही. आम्ही श्रीकृष्णावर विश्वास ठेवतो.