महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजपाच्या मार्गदर्शक मंडळाचा विस्तार, पंतप्रधान मोदी होणार निवृत्त? - BJP Margdarshak Mandal - BJP MARGDARSHAK MANDAL

BJP Margdarshak Mandal : भाजपाच्या मार्गदर्शक मंडळात ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचाही समावेश करण्यात आला आहे. भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत मार्गदर्शक मंडळात चार नेत्यांची नावं दिसत आहेत.

Narendra Modi, Rajnath Singh
नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह (ETV BHARAT National Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 9:00 PM IST

हैदराबाद BJP Margdarshak Mandal :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जून रोजी सलग तिसऱ्यांदा देशाची सूत्रं हाती घेतली. मात्र, यावेळी त्यांचं सरकार एनडीएच्या मित्रपक्षांवर अवलंबून आहे. कारण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळालेलं नाही. त्यानंतर भाजपा मार्गदर्शक मंडळाच्या सदस्यांबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा समावेश आहे.

  • भाजपाच्या www.bjp.org या अधिकृत वेबसाइटवर मार्गदर्शक मंडळात चार नेत्यांची नावं त्यांच्या छायाचित्रांसह दिसत आहेत. सोशल मीडियावर नेटिझन्स भाजपा मार्गदर्शक मंडळाचे स्क्रीनशॉट शेअर करत आहेत. पीएम मोदी आता मार्गदर्शकाची भूमिका निभावतील का, असा सवाल काही युजर्सनी केलाय.
    भाजपा मार्गदर्शक मंडळा (BJP Margdarshak Mandal (Screenshot taken from BJP website))

काँग्रेसची भाजपावर टीका : केरळ काँग्रेसनं ट्विटरवर भाजपाच्या वेबसाइटची लिंक शेअर करत लिहिलं की, भाजपाच्या वेबसाइटनुसार नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह अधिकृतपणे मार्गदर्शक मंडळात सामील झाले आहेत. फ्लोर टेस्ट अयशस्वी होण्याचं हे पहिलं लक्षण असून ही आपत्तीची तालीम आहे का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

मोदी निवृत्त होणार? : भाजपा मार्गदर्शक मंडळात पीएम मोदींबद्दलही चर्चा आहे. कारण ते पुढील वर्षी वयाची 75 वर्षे पूर्ण करणार आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. केजरीवाल यांनी दावा केला होता, की पीएम मोदी पुढील वर्षी 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षांचे होणार आहेत. त्यामुळं भाजपात ७५ वर्षांनंतर नेत्यांना निवृत्त व्हावं लागतं, असा त्यांचा नियम असल्याचा दावा त्यांनी केला होता. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, यशवंत सिन्हा निवृत्त झाले आहेत. आता पंतप्रधान मोदी 17 सप्टेंबर 2025 रोजी निवृत्त होणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ज्येष्ठ नेत्यांना सारलं बाजूला : मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2014 पासून भाजपाच्या मार्गदर्शक मंडळात समावेश करण्यात आला आहे. 2014 मध्ये पंतप्रधान मोदी पहिल्यांदा सत्तेवर आले, तेव्हा भाजपा मार्गदर्शक मंडळाची स्थापना करण्यात आली. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या नेत्यांना पक्षात योग्य तो मान देण्यासाठी मार्गदर्शक मंडळाची स्थापना करण्यात आल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. कारण या दोन ज्येष्ठ नेत्यांना मोदी सरकारमध्ये कोणतंही पद न मिळाल्यानं त्यांना बाजूला करण्यात आल्यानं प्रश्न उपस्थित केले जात होते.

हे वाचलंत का :

  1. मनसेच्या इंजिनाची दिशा काय? विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे राज ठाकरेंचे आदेश - Raj Thackeray on Assembly Election
  2. राज्यसभेची उमेदवारी डावलल्याच्या मुद्द्यावर काय म्हणाले छगन भुजबळ... - Chhagan Bhujbal
  3. मला तिकीट न मिळण्यासाठी आमच्याच पक्षातील लोकांनी सुपारी दिली होती - खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आरोप - MP Pratibha Dhanorkar

ABOUT THE AUTHOR

...view details