भुवनेश्वर Puri Firecracker Explosion : पुरू इथल्या चंदन यात्रेत फटाक्याच्या स्फोटानं तब्बल 30 भाविक होरपळून गंभीर झाले आहेत. तर 1 बालकाचा होरपळून मृत्यू झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काही जखमी भाविकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे या गंभीर भाविकांना पुढील उपचारासाठी जिल्हा मुख्यलयातील शस्त्रक्रिया वार्डामध्ये हलवण्यात आलं आहे. या आगीत तब्बल सहा भाविकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती इथल्या प्रत्यक्षदर्शीनं दिली.
फटाक्याच्या स्फोटात होरपळले भाविक :पुरी इथल्या चंदन यात्रेत बुधवारी नरेंद्र तलावातील ‘चापा खेळा’ दरम्यान फटाक्यांच्या स्फोटात 30 भाविक होरपळले आहेत. यातील काही भाविकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. तलावाच्या बाजूला देवी घाटावर फटाके फोडण्यात येत असताना ही दुर्घटना घडल्याचं सूत्रांनी सांगितलं. पवित्र तलावात जलक्रीडा पाहण्यासाठी जमलेल्या भाविकांवर फुटलेल्या फटाक्यांचे लोट पडले. त्यामुळे हे भाविक जखमी झाले. या जखमी भाविकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरुवातीला भाविकांना बाह्य विभागात नेण्यात आलं मात्र त्यानंतर त्यांना शस्त्रक्रिया वॉर्डमध्ये हलवलं गेलं. या रुग्णालयात बर्न युनिटची कमतरता असल्यानं भाविकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
एका मुलाचा होरपळून मृत्यू :फटाक्याच्या स्फोटात होरपळून तब्बल 30 भाविक जखमी झाले. या भाविकांमध्ये एका मुलाचा होरपळून मृत्यू झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेत सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. एका मुलाचा हात जळाला आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली. तर "फटाके फोडण्यासाठी अग्निसुरक्षेचे कोणतेही उपाय नव्हते. आम्ही काही लोकांना तलावातून वाचवले आहे," अशी माहिती इथं मदत बचावकार्य करणाऱ्या भाविकानं दिली. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी कटक आणि भुवनेश्वरमधील काही रुग्णालयांत जखमींना रेफर केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 18 हून अधिक गंभीर रुग्णांना कटकमधील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक :पुरीच्या एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलला भेट दिली. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. आपल्या एक्स हँडलवर त्यांनी, "पुरी नरेंद्र तलावाजवळ झालेल्या अपघाताबद्दल ऐकून वाईट वाटलं. मुख्य सचिव आणि जिल्हा प्रशासनाला जखमींवर योग्य उपचार करण्याचे आणि त्यांच्या उपचारांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. जखमींचा सर्व वैद्यकीय खर्च मुख्यमंत्री मदत निधीतून केला जाईल. जखमी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना."
हेही वाचा :
- परतवाडा येथील सदर बाजारात भीषण आग, आगीत लाखोंचं नुकसान - Patrwada Sadar Bazar Fire
- राजकोट गेम झोन अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर; ठिणगीनं 2 मिनिटांत घेतला पेट - Rajkot TRP Game Zone Fire
- गुजरातच्या राजकोट शहरात गेम झोनमध्ये 'अग्नितांडव'; 25 जणांचा होरपळून मृत्यू - Fire in Game Zone Gujarat