महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NEET 2024 चा पेपर लिक : पेपर चुकीचा वाटल्याचा आरोप; विद्यार्थी 'या' नामांकित केंद्रातून प्रश्नपत्रिका घेऊन पडले बाहेर - NEET UG 2024 Question Paper Leaked - NEET UG 2024 QUESTION PAPER LEAKED

NEET UG 2024 Question Paper Leaked : परीक्षा केंद्रात प्रश्नपत्रिका चुकीच्या पद्धतीनं वाटल्याचा आरोप करत विद्यार्थी प्रश्नपत्रिकेसह बाहेर आले. या प्रकरणी पाटण्यात अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती पाटण्याचे पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा यांनी दिली.

NEET UG 2024 Question Paper Leaked
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 7:47 AM IST

पाटणा NEET UG 2024 Question Paper Leaked :वैद्यकीय प्रवेशासाठी देशभरातील सर्वात महत्वाची असलेली नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच NEET 2024 परीक्षा रविवारी देशभरात पार पडली. या परीक्षेचा पेपर लिक झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी पाटणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. या पेपर लिक प्रकरणात आतापर्यंत NEET UG प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली. मात्र पेपर लिक प्रकरणात छापेमारी करण्यात आल्याच्या माहितीला पाटणाचे पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा यांनी दुजोरा दिला आहे.

NEET 2024 परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी पाटणा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अनेक ठिकाणी छापेमारी केली. याप्रकरणी पोलिसांनी पाटण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी काही संशयितांची चौकशी सुरू आहे. - राजीव मिश्रा, पोलीस अधीक्षक पाटणा

प्रश्नपत्रिका घेऊन विद्यार्थी आले बाहेर : देशभरात रविवारी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET 2024 घेण्यात आली. उच्च माध्यमिक आदर्श बालिका विद्यामंदिर सवाई माधोपूर या केंद्रावर विद्यार्थी प्रश्नपत्रिका घेऊन जबरदस्तीनं केंद्राबाहेर आले. केंद्र अधीक्षकांनी प्रश्नपत्रिका चुकीच्या पद्धतीनं वाटल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थी गोंधळ घालत असताना त्यांना पर्यवेक्षकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थ्यांनी त्यांना जुमानलं नाही. प्रश्नपत्रिका घेऊन विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर आले. याबाबत परीक्षा संपल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं एक नोटीस जारी केली. यात नमूद करण्यात आलं आहे की, "राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या निदर्शनात आलं आहे, की NEET UG 2024 परीक्षेत उच्च माध्यमिक आदर्श बालिका विद्यामंदिर सवाई माधोपूर इथं विद्यार्थी बाहेर आले. केंद्र अधीक्षकानं प्रश्नपत्रिका चुकीच्या पद्धतीनं वाटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. पर्यवेक्षकांनी थांबवूनही काही विद्यार्थी प्रश्नपत्रिका घेऊन जबरदस्तीनं बाहेर आले"

देशभरात 557 शहरात झाली परीक्षा : वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET 2024 ही 5 मे रोजी देशभरातील 557 शहरांमधील 4 हजार 750 केंद्रांवर घेण्यात आली. दुपारी 2 वाजता परीक्षा सुरू होऊन सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू होती. या परीक्षेला तब्बल 24 लाख विद्यार्थी बसले होते.

हेही वाचा :

  1. नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; आत्महत्या विरोधी रॉड न लावल्यानं होणार वसतिगृह चालकावर कारवाई
  2. कोचिंग सेंटरच्या 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; शिकवणी वर्गात 500 विद्यार्थी घेत होते NEET, JEE ची शिकवणी - Students Suffer Food Poison
  3. आज NEET परीक्षा! परीक्षेला जाण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी - NEET UG 2024

ABOUT THE AUTHOR

...view details