हैदराबाद Gold Locket Stuck In The Child Neck: डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. कारण डॉक्टरच मनुष्याला मृत्यूच्या दारातून परत आणू शकतो आणि जीवनदान देऊ शकतो. जगात अशी अनेक उदाहरणं आहेत. याचं ताज उदाहरण राजस्थानमधील बालोत्रा जिल्ह्यात समोर आलं आहे. डॉक्टरांनी चार महिन्याच्या बाळानं गिळलेलं सोन्याचं लॉकेट काढून बाळाला नवजीवन दिलं आहे. याबाबत रुग्णालयाचा ऑपरेशन थिएटरचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये डॉक्टरांची संपूर्ण टीम बाळाच्या गळ्यातील सोन्याचं लॉकेट काढताना दिसत आहे. यात डॉक्टरांना यश आलं, चार महिन्याच्या निरागस बाळाला जीवनदान मिळालं. कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी डॉ.जी.आर.भेल आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.
काय घडलं :गुडामलानी परिसरातील आजी आपल्या ४ महिन्यांची नात अर्पिताला आपल्या मांडीवर घेऊन बसली होती. आजीच्या मांडीवर खेळत असतानाच बाळानं सोन्याचं लॉकेट गिळलं. लॉकेट बाळाच्या फूड पाईपमधून गेलं आणि छातीजवळ अडकलं. काही वेळातच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. निरागस बाळाची प्रकृती बिघडत असल्याचं पाहून कुटुंबीयांनी तत्काळ बाळाला बालोत्रा येथील खासगी रुग्णालयात नेलं. येथे डॉ. जी. आर. भिल आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं बाळाच्या गळ्यातील सोन्याचं लॉकेट काढून जीवनदान दिलं.