कृष्णनगर Lok Sabha election 2024 : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मीर जाफर अचानक चर्चेत आले आहेत. मीर सय्यद जाफर अली खान बहादूर यांना मीर जाफर (1691-1765) म्हणून ओळखलं जातं. ते बंगालचे पहिले आश्रित नवाब म्हणून राज्य करणारे सैन्यदलाचे सेनापती होते. बंगालचा शेवटचा स्वतंत्र नवाब सिराज-उद-दौला यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी बंगाली सैन्याचा कमांडर म्हणून काम केलं. परंतु जाफरनं प्लासीच्या लढाईत सिराज-उद-दौल यांचा विश्वासघात केला. त्यानंतर 1757 मध्ये प्लासीच्या लढाईत विजय मिळविल्यानंतर ब्रिटिशांनी देशावर 200 वर्षे राज्य केले.
लॉर्ड क्लाइव्ह, मीर जाफर यांना 1760 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीकडून सैन्यदलाची मदत मिळाली. राजा कृष्णचंद्र रॉय हे मीर जाफरचे मित्र होते. भाजपानं राजा कृष्णचंद्र रॉय यांच्या वंशज अमृता रॉय यांना कृष्णनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिल्यानंतर सोशल मीडियात चर्चा सुरू झाली. राजा कृष्णचंद्र राय यांच्या इतिहासाचा हवाला देऊन भाजपाच्या उमेदवाराची खिल्ली उडवली जात आहे.
इतिहासात डोकावल्यावर आपल्याला असं दिसून येतं की कृष्णचंद्र रॉय हे रॉबर्ट क्लाइव्ह, जगदीश शेठ, मीर जाफर यांच्या गटात होते. या गटासह इतरांनी सिराज-उद-दौला यांच्या विरोधात कट रचल्यानं ब्रिटिशांनी युद्धात विय मिळविता आला होता. कृष्णचंद्र यांनी ब्रिटीश आणि विशेषत: रॉबर्ट क्लाइव्ह यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवले होते. बंगालचा नवाब मीर कासिम यानं 1760 च्या दशकात कृष्णचंद्र रॉय यांना फाशीची सुनावण्यात आली. तेव्हा कृष्णचंद्र यांचे चांगले संबंध कामी आले. फाशीची शिक्षा रद्द करण्याबरोबरच क्लाइव्हनं रॉय यांना पाच तोफाही भेट दिल्या. कृष्णचंद्र यांना कृष्णनगर भागाचा जमीनदार बनवलं. केवळ जमीनदार असताना त्यांना महाराजा या पदवीनंही गौरविण्यात आलं.
भाजपा त्यांचा बंगला विकेल-भाजपानं राजा कृष्णचंद्र यांच्या वंशज महाराणी अमृता रॉय यांना कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून निवडल्यानंतर नेटिझन्स संतप्त झाले. अमृता रॉय या तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्याविरोधात कृष्णानगर मतदारसंघात निवडणूक लढविणार आहेत. मीर जाफरप्रमाणे राजा कृष्णचंद्र यांना बंगाल विकायचा होता. भाजपाही तेच करेल, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.