महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सात वर्षाच्या चिमुकलीचा अत्याचार करुन खून: मृतदेह आढळला मोहरीच्या शेतात - चिमुकलीचा अत्याचार करुन खून

Minor Girl Rape : उत्तरप्रदेशातील एटा इथं सात वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिचा गळा दाबून खून करण्यात आला. या घटनेनंतर मारेकऱ्यांनी चिमुकलीचा मृतदेह मोहरीच्या शेतात फेकून दिला.

Minor Girl Rape
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 11:13 AM IST

लखनऊ Minor Girl Rape : सात वर्षाच्या चिमुकलीचा गळा दाबून हत्या केल्यानं खळबळ उडाली होती. या चिमुकलीवर अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. पीडित चिमुकलीचा मृतदेह मोहरीच्या शेतात आडळून आला आहे. चिमुकलीचा मृतदेह शेतात आढळून आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी मारेकऱ्याच्या शोधासाठी 4 पथकांची स्थापना केली आहे. ही चिमुकली खेळण्यासाठी घरातून बाहेर पडली होती, मात्र ती परत न आल्यानं कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र चिमुकलीचा मृतदेहच आढळून आल्यानं मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सात वर्षाच्या चिमुकलीचा अत्याचार करुन खून

प्राथमिक तपासात चिमुकलीवर अत्याचारानंतर तिचा खून करण्यात आला आहे. पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी 4 पथकं स्थापन करण्यात आली आहेत. पोलीस लवकरच या घटनेतील मारेकऱ्याला पकडतील. - राजेश कुमार सिंह, पोलीस अधीक्षक

चिमुकली गेली होती खेळण्यासाठी बाहेर :सात वर्षाची चिमुकली खेळण्यासाठी घरातून गेली होती. मात्र ती परत न आल्यानं तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेतला. मात्र ही चिमुकली आढळून आली नाही. त्यामुळं शेतातून घरी आलेल्या तिच्या वडिलांनी सायंकाळी पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली. त्यामुळं पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून चिमुकलीचा शोध घेतला. पोलीस पथक गावात दाखल झालं. त्यानंतर पोलिसांनी श्वान पथकांच्या मदतीनं चिमुकलीचा शोध घेतला. यावेळी पोलिसांच्या स्निफर डॉग पथकानं रात्री मोहरीच्या शेतातून चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढला.

अत्याचारानंतर चिमुकलीचा गळा दाबून खून :"ही चिमुकली गावातील इतर मुलांसोबत खेळायला गेली होती. मात्र ती घरी आली नव्हती. त्यामुळं मला काळजी वाटू लागली होती. त्यानंतर चिमुकलीचा शोध घेतला. मात्र काहीच मागमूस न मिळाल्यानं पोलिसांना कळवण्यात आलं," असं पीडितेच्या वडिलांनी यावेळी सांगितलं.

आरोपीला लवकरच पकडणार : "प्राथमिक तपासात चिमुकलीवर अत्याचारानंतर तिचा खून करण्यात आला आहे. पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी 4 पथकं स्थापन करण्यात आली आहेत. पोलीस लवकरच या घटनेतील मारेकऱ्याला पकडतील," अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश कुमार सिंह यांनी दिली.

हेही वाचा :

  1. गावगुंडाचं क्रौर्य, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून दिले सिगारेटचे चटके; मुंडणही केलं
  2. 'निकाह'चे नाव पुढे करून बलात्काराचे समर्थन करणाऱ्या आरोपीचा जामीन फेटाळला
  3. अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमातून लैंगिक संबंध; हायकोर्ट म्हणाले 'लैंगिक अत्याचार' म्हणता येणार नाही

ABOUT THE AUTHOR

...view details