नवी दिल्लीMaharashtra Assembly election :केंद्रीय निवडणूक आयोगानं (ECI) शुक्रवारी हरियाणा तसंच जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणूक मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार असून पहिला टप्पा 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. दुसरा टप्पा 25 सप्टेंबरला आणि शेवटचा टप्पा 1 ऑक्टोबरला होणार आहे.
4ऑक्टोबरला निकाल :या निवडणुकांचे निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुका 1 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात होणार आहेत. जम्मू-काश्मीरच्या दुसऱ्या टप्यात श्रीनगर, गंदरबल, पुंछ, राजौरी आणि रियासी या मतदारसंघात निवडणूक होणार आहे. शेवटच्या टप्प्यात उत्तर काश्मीर, उधमपूर, जम्मू आणि कठुआ या केंद्रशासित प्रदेशात मतदान होईल. मतदानाच्या तारखांची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार म्हणाले की, संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात शांततापूर्ण निवडणुकांसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था केली जाईल.
मागील वेळी हरियाणाबरोबरच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी जम्मू काश्मीरचा मुद्दा नव्हता. यावेळी पाच निवडणूका आहेत. सुरक्षा दलाच्या बंदोबस्ताचा मुद्दा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात खूप पाऊस झाला. गणेशोत्सव, नवरात्र असे उत्सव आहे. तसेच पितृपक्ष आहे. त्यामुळे एकाचवेळी निवडणूका घेता येत नाहीत- मुख्य निवडणूक आयुक्त, राजीव कुमार
तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका :उल्लेखनीय म्हणजे, हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. हरियाणा तसंच महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ अनुक्रमे 3 नोव्हेंबर तसंच 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. झारखंडच्या विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी जानेवारीमध्ये संपेल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले, झारखंड आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील निवडणुका जम्मू काश्मीर तसंच हरियाणा राज्यातील निवडणुका पार पडल्यावर होतील. 2014 पासून जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या नाहीत. 2019 मध्ये, कलम 370 रद्द केल्यानंतर तिथं राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या टीमनं 8-9 ऑगस्टला जम्मू-काश्मीर आणि 12-13 ऑगस्टला हरियाणाला भेट दिली होती. आयोगानं अद्याप महाराष्ट्र आणि झारखंडचा दौरा केलेला नाही. अशा परिस्थितीत जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत.
'हे' वाचलंत का :
- जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार, 4 ऑक्टोबरला लागणार निकाल - Assembly Election 2024 Schedule
- महाविकास आघाडीचा आर या पारचा नारा : "एक तर तू राहशील किंवा मी राहीन...", आघाडीनं फुंकलं विधानसभेचं रणशिंग - Maharashtra Assembly Election 2024
- बायोपिकच्या माध्यमातून 'राज' झळकणार मोठ्या पडद्यावर? तेजस्विनी पंडितबरोबरचा फोटो झाला व्हायरल - Raj Thackeray Biopic