महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

निपाह विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या मुलाचा मृत्यू, केरळ सरकारची वाढली चिंता! - Kerala Nipah Virus - KERALA NIPAH VIRUS

Kerala Nipah Virus निपाह विषाणुची लागण झालेल्या 14 वर्षीय मुलाच्या मृत्यूनं केरळमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रादुर्भाव जास्त वाढू नये, म्हणून विविध उपाययोजना आखण्यात असल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली आहे.

KERLA HEALTH MINISTER VEENA GEORGE
केरळ आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 21, 2024, 1:28 PM IST

हैदराबाद Kerala Nipah Virus: केरळच्या मलप्पुरम येथे निपाहची लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. दुसरीकडं विषाणूच्या संभाव्य उद्रेकाबाबत सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. त्या म्हणाल्या की, "विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मानक कार्यप्रणालीच्या आधारे 25 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मांजेरी मेडिकल कॉलेजमध्ये 30 आयसोलेशन खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय कोझिकोडमध्ये आवश्यक आयसोलेशन वार्डची व्यवस्था करण्यात आली."

शनिवारी 14 वर्षाच्या मुलाचा निपाह व्हायरस रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मुलाच्या संपर्कातील लोकांची माहिती गोळा केली जात आहे. निपाह व्हायरच्या प्राथमिक संपर्क यादीत 214 लोक आहेत. त्यातील 60 लोकांना जास्त धोका आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं. संबंधित लक्षणे आढळल्यास नियंत्रण कक्षाला फोन करण्याचं वीणा जॉर्ज यांनी जनतेला आवाहन केलं.

निपाह विषाणू काय आहे:निपाह विषाणू प्राणघातक आहे. हा विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो. प्रामुख्याने वटवाघळांमुळे हा विषाणू पसरतो. याव्यतिरिक्त डुक्कर, बकरी, घोडा, कुत्रा आणि मांजर या प्राण्यांमधून देखील पसरु शकतो. प्राण्याच्या शरीरातील रक्त, विष्ठा, मूत्र किंवा लाळ या मार्फत हा विषाणू पसरतो.

  • ही आहेत विषाणूची लक्षणे
  1. ताप
  2. श्वास घेण्यास अडचण
  3. खोकला आणि घसा खवखवणे
  4. उलट्या
  5. अतिसार
  6. हाडे दुखणे
  7. अशक्तपणा
  8. डोकेदुखी
  9. मेंदूला सूज
  10. चक्कर येणे

विषाणू पासून बचाव कसा करावा:निपाह विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी अद्याप लस उपलब्ध नाही. केरळमध्ये विषाणूची लागण झाल्यानं दोघांचा मृत्यू झालाय. संशयित रुग्णाचे नमुने पुण्याच्या व्हायरोलॉजी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे व्यर्थ बाहेर पडणे टाळावे. जास्त काळ डोकेदुखी, श्वासोच्छवासाचा त्रास झाल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा.

2018 मध्ये निपाह विषाणूमुळे 21 जणांचा मृत्यू झाला होता. मलेशियातील सुंगई निपाह गावात सन 1998 मध्ये सर्वप्रथम निपाहची लागण झाली होती. त्यामुळे या विषाणूला निपाह नाव देण्यात आले. केरळमध्ये 2018, 20121 आणि 2023 मध्ये निपाहची प्रकरणे नोंदवण्यात आली. 2023 मध्ये 3 जणांचा निपाहमुळे मृत्यू झाला.

हेही वाचा

  1. Nipah Virus : निपाह व्हायरसवर ICMR च्या डॉक्टरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'निपाह व्हायरस...'
  2. Nipah Virus In Kerala : निपाह व्हायरसच्या वाढत्या धोक्यावर डॉ. भारती पवारांनी घेतला आढावा; उपाययोजना करण्याचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details