महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काश्मीरच्या पत्रकाराला न्यायालयाकडून जामीन; यूएपीए प्रकरणात होता कोठडीत, एकेकाळी अमेरिकन प्रेस क्लबनं केला होता सन्मान - Kashmiri Journalist Granted Bail

Kashmiri Journalist Granted Bail : जम्मू काश्मीरमधील पत्रकार आसिफ सुल्तान यांना यूएपीए कायद्यानुसार अटक करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांना श्रीनगरच्या कारागृहात बंद करण्यात आलं होतं. त्यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.

Kashmiri Journalist Granted Bail
पत्रकार आसिफ सुल्तान (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 2:13 PM IST

श्रीनगर Kashmiri Journalist Granted Bail : जम्मू काश्मीरचे पत्रकार आसिफ सुल्तान यांना देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी यूएपीए कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. आसिफ सुल्तान यांना श्रीनगरच्या मध्यवर्ती कारागृहात बंद करण्यात आलं होतं. मात्र श्रीनगरच्या न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला आहे. आसिफ सुल्तान यांना देशविघातक कृत्य केल्याच्या आरोपांवरुन अटक करण्यात आली होती. त्यांना जम्मू काश्मीरच्या उच्च न्यायालयानं सोडण्याचे आदेश दिले आहेत.

पत्रकार आसिफ सुल्तान यांच्यावर यूएपीए नुसार गुन्हा :जम्मू काश्मीरचे पत्रकार आसिफ सुल्तान यांच्यावर देशविगात कृत्य केल्याचा आरोप ठेवत यूएपीएनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आसिफ सुल्तान यांना श्रीनगरच्या मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आलं होतं. याबाबत अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप गंडोत्रा यांनी 10 मे रोजी याबाबत आदेश दिला आहे. याबाबत त्यांनी नमूद केलं आहे की, यूएपीए तरतुदी लागू करणं आणि कायदेशीर विचार न करता जामीन नाकारणं योग्य ठरत नाही. बेकायदेशीर प्रतिबंध कायद्यांतर्गत आरोपांची चौकशी करणं सक्तीचं आहे, यात वाद असू नये. या वैधानिक तरतुदींचा केवळ वापर केल्यानं जामीन फेटाळण्याची हमी मिळत नाही, असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

जामीन देताना न्यायालयानं घातल्या अटी :जम्मू काश्मीर न्यायालयानं पत्रकार आसिफ सुल्तान यांना जामीन मंजूर करताना अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. यात आसिफ सुल्तान यांना इन्सक्रिप्टेट मॅसेज अ‍ॅप किंवा प्रॉक्सी नेटवर्क वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. हॉटस्पॉट किंवा वायफायद्वारे इतरांना दूरसंचार सुविधा देण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलं आहे. त्यासह नवीन मोबाईल फोन किंवा सिमकार्ड खरेदी करण्यास आसिफ सुल्तान यांना न्यायालयाची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

आसिफ सुल्तान 2018 पासून कारागृहात :आसिफ सुल्तान हा एका मासिक वृत्तपत्रासाठी काम करत होता. मात्र 2018 पासून कोठडीत आहे. त्यांना वेगवेगळ्या यूएपीए गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. श्रीनगर न्यायालयानं त्यांना 2022 मध्ये जामीन मंजूर केला होता. मात्र त्यानंतर पुन्हा त्यांच्यावर जम्मू काश्मीर सार्वजनिक सुरक्षा कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आसिफ सुल्तान यांना अमेरिकन नॅशनल प्रेस क्लबकडून जॉन ऑबुचॉन प्रेस फ्रिडम पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा :

  1. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना जवानाला वीरमरण, जूनमध्ये मुलाच्या वाढदिवासाला येणार होते घरी - Chhindwara Soldier Vicky Martyred
  2. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, जवानाचा मृत्यू, दुसऱ्या जवानाची प्रकृती चिंताजनक - Terrorist attack Air Force convoy
  3. जम्मू-काश्मीरमधील पनारा गावात दहशतवाद्यांशी चकमक, ग्राम रक्षक दलाच्या जवानाला वीरमरण - Terrorist attack in Panara village

ABOUT THE AUTHOR

...view details